गुरुवार, ९ मे, २०२४

Exploring the Meanings of "Matang" and "Mang" Across Asian Languages

 Exploring the Meanings of "Matang" and "Mang" Across Asian Languages


The words "matang" and "mang" carry significant meanings in various Asian languages, reflecting the rich linguistic diversity of the continent. Let's delve into the nuances and cultural contexts of these terms.


"Matang" in Indonesian and Malay Languages:

In Indonesian and Malay, "matang" is a versatile word with several meanings. It can denote maturity or ripeness when referring to fruit or other objects. For example, a "buah yang matang" is a ripe fruit. The term also applies to concepts such as maturity in age or the completion of a process, akin to the English words 'mature' or 'ripe'.


"Matang" in Filipino:

In the Filipino language, "matang" is a combination of the word "matá," meaning eye, and the ligature "ng," which connects the word to another noun. Therefore, "matang" can be translated to "eye of" or "eyes on," depending on the context.                                                         The translation of "matang" in Marathi is "मातंग" which can refer to a sage or an elephant. In the context of "mang," it translates to "गिल" in Marathi, which could mean a branch or twig, depending on the context. It's fascinating to see how words can have different meanings and significance across languages and cultures. The process of translation not only helps in communication but also in understanding the cultural nuances embedded in language.


"Mang" in Mandarin Chinese:

In Mandarin Chinese, "mang" means "busy." It is often used in daily conversation to inquire about someone's availability or to express one's own busyness. For instance, "你忙不忙?" (nǐ máng bù máng?) translates to "Are you busy?" in English.


"Mang" in Cantonese:

The term "mang" in Cantonese has a historical context, originally used among Chinese immigrants in the United States during the 19th century. It referred to a "busybody" or "meddler." Over time, the term has evolved and sometimes is used to describe a group of Asian men perceived as non-masculine.


"Mang" in Southeast Asian Context:

In a broader Southeast Asian context, "mang" can refer to a type of fruit or the act of gathering or harvesting fruit. This usage highlights the agricultural roots and tropical climate of the region, where fruit harvesting is a common activity.


The exploration of "matang" and "mang" across Asian languages showcases the intricate ways in which simple terms can hold different meanings and cultural significance. These words are not just linguistic elements but are embedded in the daily lives, history, and social interactions of the people who use them.


Understanding these terms provides a glimpse into the cultural fabric of Asia, where language is an essential tool for communication and cultural expression. As we continue to explore the vast array of languages and dialects across the continent, we uncover the depth and diversity that language holds within each culture. Whether it's the ripeness of fruit or the busyness of daily life, "matang" and "mang" serve as linguistic bridges connecting us to the rich traditions and lifestyles of Asian societies.

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

मातंग वधुवर सुचक व सहकार्य ग्रुपच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नाचा लेखाजोखा

*थोडासा संवाद*
 मातंग वधुवर सुचक व सहकार्य ग्रुपच्या माध्यमातून मागील वर्षी व्हाटस अप ग्रुप सुरू करण्यात आले. अक्षरक्ष: बायोडाटांचा व मेसेजचा ओघ सुरू झाला. मात्र लग्नसराई चा मौसम सुरू होऊनही पाहिजेत तसेच बायोडाटा आता येत नाहीत. येतात ते रिपीट झालेलेच. इतरांच्या ग्रुपवरही तिच परिस्थिती आहे. पुर्वी 1988 पुर्वीचे अनेक बायोडाटा यायचे आता ते फारच कमी झालेत. खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे. कि कोणत्या का माध्यमातून अनेकांची लग्न जुळून आले आहेत. अनेकांची लग्न जुळून आल्यामुळे बायोडाटांचा ओघ कमी झाला आहे. त्यातच ग्रुपमध्ये इतर वधुवर ग्रुपची लींक टाकुनी अनेकांनी ग्रुप सुरू केले आहेत. आम्ही एक एक पालकांचा मोबाईल नंबर मिळवून त्यांचा मोबाईल नंबर सेव्ह करून ग्रुप सुरू केला. मात्र इतरांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारल्या . प्रत्येक जिल्ह्यातील व्यक्ती जोडुन त्या जिल्ह्यात ग्रुप सुरू केला. नंतर त्याचेच अनुकरण इतरांनी सुध्दा केले व्यवसायीक संस्थांनी केले. शिखंडीना हाताशी धरून लींक ग्रुपमध्ये टाकल्या ग्रुप सुरू केले. आनंदाची गोष्ट हिच आहे की समाज बांधवापर्यंत बायोडाटे सहज पोहोचू लागले. *मातंग वधुवर सुचक व सहकार्य ग्रुपने कधी स्वतःची जाहिरात केली नाही. इतरांच्या बायोडाटाखाली स्वत:चे नंबर टाकले नाही. ग्रुपचे नाव लिहीले नाही. कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजासाठी चिमणीच्या चोचीने का होईना काम करायचे हाच उद्देश होता. वधुवरांच्या धन्यवादाची सुध्दा अपेक्षा केली नाही. आणखी सर्वात महत्त्वाचा उद्देश होता. *महाराष्ट्रातील मातंग समाज ग्रुपच्या माध्यमातून एकत्रीत यायला हवा*. ग्रुपचा काम करण्याचा मुळ सिध्दांत जो होता. *कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त समाजाला काही देता यावे या भावनेतून काम करणारे कार्यकर्ते पुढे यावेत*. ना प्रसिध्दिची भावना, ना नेता होण्याची महत्त्वाकांक्षा या प्रकारचे सामाजिक कार्यकर्ते तयार व्हावेत. ज्यांनी समाजाला फक्त देण्याचे आणि देण्याचेच काम करावे. समाजात करोडो संघटना आहेत पण समाजाला उपयोगी होईल असे काम जर सर्वांनीच केले.तर समाजात अनेक समाज उपयोगी उपक्रम सुरू होतील. करोडो कार्यकर्ते समाजासाठी झटतील. 
           पण खुप साऱ्या समाज संघटना फक्त दबावगट होऊनच काम करतात. संघटना मोठी होऊन आपन त्याचे नेते राहू आपन प्रसिद्ध होऊ हा उद्देश असतो. *समाजाला काय द्यायचे , काय देता येऊ शकते याचे नियोजन कोणाकडे नसते.* त्यामुळे संघटने कडुन समाजाला काही देता येत नाही. संघटनांच्या नावावरच हजारो संगठन तयार होऊन समाज लाखो ठिकाणी विखुरलेल्या गेला आहे. त्यामुळे संघटनांचा फायदा खुप कमी होतो. कुठे अन्याय झाला तर अनेक संघटना निवेदन देतात.त्यामुळे कार्यवाही वैगेरे होते पण समाजावरचा अन्याय काही कमी होत नाही. कारन अन्याय कमी करण्यासाठी समाज ताकदवान, सामर्थ्यवान होने आवश्यक आहे. समाज जर सामर्थ्यवान करायचा असेल. तर एक वैचारिक, आर्थिक, राजकीय, प्रशासकीय, सांस्कृतिक सामर्थ्य तयार करावे लागेल. व ते एका दिवसात तयार होणार नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे नियोजन करून कष्ट घ्यावे लागतील. त्यासाठी समाजातील प्रत्येक समाज बांधवांनी " कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजासाठी काम करावे लागेल" परंतू  स्वार्थासाठी, प्रसिध्दीच्या हव्यासासाठी काम करणारे भरपूर आहेत. समाजासाठी काम करणारे कमी. सहकार्य ग्रुपच्या माध्यमातून निरपेक्ष भावनेने काम करणारे कार्यकर्ते हेरून सामाजिक काम आणखी मोठे करता येईल ही भावना होती. पण काहिंनी ही भावना न ओळखता ज्यांच्यावर विश्वास होता त्यांनीच गद्दारी केली. व वेगळा ग्रुप सुरू केला. कालपर्यंत गल्लीतलं कुत्र ज्यांना ओळखत नव्हते त्यांना सहकार्य ग्रुपचे पद मिळाल्यामुळे महाराष्ट्र भरातुन मोठमोठ्या पदावरील, प्रतिष्ठीत पालकांचे फोन यायला लागले. आणि त्यांच्या डोक्यात ही प्रसिध्दीची हवा भरली. ग्रुप फोडुन वेगळा ग्रुप सुरू केला.  पण वधुवर ग्रुप हे एक उदाहरण होतं, नमुना होता कि समाजासाठी आपन काम करू शकतो. आपन निरपेक्ष भावनेने काम करणारे व्यक्ती समाजात चांगले काम करू शकतो. सामाजिक काम करण्याच्या अनेक वाटा आहेत. आनंददायी वाटा आहेत. पैसा, प्रसिध्दी मिळाली नाही तरी प्रेम , जिव्हाळा, आनंद मिळवून देणाऱ्या आहेत. सहकार्य ग्रुपच्या माध्यमातून लवकरच अनेक उपक्रम हाती घेण्यात येतील. आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. यासाठी सहकार्य ग्रुपमध्ये आपले स्वागत आहे. सहभागी व्हा🙏🙏🙏🙏
                             9823453275 

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

डाॅ.अण्णाभाऊ साठेंचा मातंग समाजाला खरा संदेश .

अण्णाभाऊ हे मार्क्सवादी, साम्यवादी विचारसरणीचे होते. त्यांच्या लेखणाची सुरूवातच स्टॅलीनग्राडचा पोवाडा लिहुन झाली. जेव्हा भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळीचे वारे वाहत होते अनेक घडामोडी घडत होत्या, अण्णाभाऊ साठे मात्र त्यांनी प्रभावीत झाले नाहीत. त्यावर कधी अण्णाभाऊंनी पोवाडा लिहीला नाही.भारताचे स्वातंत्र्य कधी अण्णाभाऊंच्या लिखाणाचा विषय राहीला नाही.उलट दे.भ. च भूत नावाच्या एका गोष्टी मध्ये अण्णाभाऊंनी देशभक्तीची खिल्ली उडवली आहे. कारण स्वयंस्पष्ट आहे कि अण्णाभाऊ मार्क्सवादी होते. देशाच्या व धर्माच्या नावावर होणाऱ्या शोषणाची त्यांना कल्पना होती. देशातील लोकांच्या स्वातंत्र्यासाठी अण्णाभाऊ लढत होते. स्वातंत्र्य भारतातही जर कामगार, दलित, कष्टकरी यांना उपाशी पोटाने झोपावे लागत असेल तर स्वातंत्र्य हे प्रत्यक्षात  नसून फक्त शब्द आहे. त्यामुळे अण्णाभाऊ कष्ट करणाऱ्या समाजाला मानसन्मानाचे दिवस यावेत यापेक्षाही मोठया  स्वप्नाशी अण्णाभाऊची बांधिलकी होती ते स्वप्न म्हणजे कष्टकरी, कामगाराचे राज्य देशावर असावे.रशियामध्ये झालेल्या कामगार कष्टकरी यांच्या क्रांतीची भुरळ अण्णाभाउंना पडलेली होती. जिथे कष्टकरी, श्रमिक, दलित यांनी शोषण कर्त्यांचे राज्य उलथून फेकले , अण्णाभाऊ साठे त्या क्रांतीच्या प्रेमात होते. व ती क्रांती भारतात व्हावी यासाठी अण्णाभाऊंचे जलसे, पोवाडे, कादंबऱ्या, नाटके होते. मॅक्जीमम गाॅर्कीच्या साहित्याच्या प्रेरनेतून क्रांतीच्या ज्वाला रशियात उसळल्या त्याच प्रकारे अण्णाभाऊ आपल्या साहित्यातून कष्टकरी समाजाला प्रेरणा देत होते. 
             अण्णाभाऊंचे कार्य जगाला उमजत होते म्हणुनच अण्णाभाऊंच्या साहित्याचे जगातल्या २८ भाषांमध्ये अनुवाद होत होता. जगातले साम्यवादी राष्ट्रांमध्ये अण्णाभाऊंचे साहित्य लोकप्रिय होत होते. मात्र भारतामध्ये १९४९ मध्ये मोरारजी देसाईंनी मुख्यमंत्री असताना अण्णाभाऊंच्या साहित्यावर बंदी आणली होती. अण्णाभाऊंनी लोकजागृती करू नये म्हणुन खोट्या दरोड्याच्या केसेस अण्णाभाऊवर भरलेल्या होत्या. त्यांच्या नावाने पकड वाॅरंट काढले होते. 
              अण्णाभाऊ फक्त साहित्यीक किंवा लोकशाहीर नाहीत. अण्णाभाऊंना साहित्यीक किंवा लोकशाहीर म्हणने म्हणजे अण्णाभाऊंच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला मर्यादित केल्याप्रमाने होईल. अण्णाभाऊंचे व्यक्तिमत्व त्यापेक्षा मोठे होते. अण्णाभाऊ दिनदुबळ्या समाजाचे क्रांतीनायक होते. अण्णाभाऊ क्रांतीयोध्दे होते. अण्णाभाऊ गुलाम समाजाचे लढावू योध्दा होते. फसलेल्या क्रांती आंदोलनाचे सरदार होते. अण्णाभाऊंना लोकशाहीर म्हणने म्हणजे अण्णाभाऊ लोकांचे मनोरंजन करत होते असा त्यांचा अर्थ होईल . पण अण्णाभाऊंचा जलसा हा लोकांना क्रांतीसाठी चेतवणारा होता. मनोरंजनासाठी नाही. अण्णाभाऊंना लोकशाहीर म्हणने म्हणने म्हणजे अण्णाभाऊंच्या क्रांतीच्या नायकाची उपेक्षा करने होय. अण्णाभाऊच्या साहित्यातील नायक अत्यंत खडतर परिस्थितीत लढत राहतात. जीवघेण्या परिस्थितीतही उमेद सोडत नाहीत. गरीब असले तरी लाचारी पत्कारत नाहीत. अण्णाभाऊ दलितांना, उपेक्षितांना साहित्यातून जगण्याची दिशा देतात. ती दिशा क्रांतीकडे बोट दाखवते. अण्णाभाऊंनी कधी जातीय , धार्मिक संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांचे सभासदही अण्णाभाऊ झाले नाहीत. शिवाजी महाराज, महाराष्ट्र, बाबासाहेब, रशियन क्रांती यांच्यावर पोवाडे गीत लिहीणारे अण्णाभाऊ मातंग समाजावर गीत लिहीत नाहीत. कारण अण्णाभाऊंच्या अंगी साम्यवाद मार्क्सवाद कुटून भरलेला होता. जात हा धर्माचा भाग आहे. आणि धर्म ही अफुची गोळी आहे. यावर त्यांचा ठाम विश्वास होता. गरिबी, लाचारी, शोषण हे सर्व विसरण्यासाठी धर्माचा वापर केला जातो. हे मत अण्णाभाऊना मान्य असल्यामुळे जाती धर्मापासून अण्णाभाऊ अलिप्तच होते.
               मातंग समाजातील फकिरा त्यांनी नायक म्हणुन प्रकाशात आणला पण जातीय उदोउदो फकिरात नाही तर त्याच्या संघर्षाचा उदोउदो कादंबरीत केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भारतीय राजकारणात तळपत होते. समतेसाठी संघर्ष करत होते. त्याचा परिणाम अण्णाभाऊंच्या साहित्यावर होणारच होता. त्यामुळे तो साहिजकच काही कथांवर जाणवतोच. अण्णाभाऊ मार्क्सवादी पक्षाचे सभासद होते, प्रचारक होते. तर बाबासाहेब एका मोठ्या पक्षाचे नेते होते. अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर समाजाने स्विकारले असले तरी जिवंत असतांनी त्यांच्या कार्यामागे समाज एकजुटीने उभा असल्याचे दिसत नाही. फक्त मातंग समाजालाही अण्णाभाऊंनी कधी  साद दिली ही नाही. त्यांनी संपुर्ण शोषीत समाजालाच आपल्या वर्तुळात घेण्याचा प्रयत्न केला.तोही समाज म्हणुन नव्हे तर एक वर्ग म्हणुन. बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ यांचे धेय्य एक होते. समाजात सर्व क्षेत्रात समानता स्थापित करणे. परंतु त्यांची कार्यपध्दती भिन्न होती. जात धर्म ही वास्तविकता आहे हे बाबासाहेबांना मान्य होते व लोक जाती पलिकडे विचार करू शकत नाहीत. हे बाबासाहेबांना माहीत होते त्यामुळे मार्क्सवाद स्विकारणारे सुध्दा भारतात जातीयवाद करतातच हे बाबासाहेबांनी वारंवार सांगितले. पण अण्णाभाऊ त्याबाबत मोठे आशावादी होते. एक दिवस मार्क्सवाद समजल्यानंतर जात धर्म नष्ट होतील यावर त्यांचा विश्वास होता. मात्र बाबासाहेबांच्या बद्दल अण्णाभाऊंना अमाप आदर होता. म्हणुनच फकिरा ही कादंबरी बाबासाहेबांच्या लेखणीला अर्पण केली. बाबासाहेब बुध्दाच्या मार्गाने परिवर्तन आणु इच्छित होते. तर अण्णाभाऊ मार्क्सवादाने . त्यामुळे मातंग समाजाने अण्णाभाऊंना अपेक्षित मार्क्सवाद स्विकारला तर शोषन करणाऱ्यांना जास्त नुकसान दायक होईल. कारण मार्क्स हा रक्तरंजित क्रांतीवर विश्र्वास ठेवतो. परंतू दुर्दैवाची गोष्ट मातंग समाज अण्णाभाऊंच्या विचारांचा मागोवाच घेत नाही. अण्णाभाऊ लेखक आहेत पण अण्णाभाऊंचे अनुयायी वाचक नाहीत. त्यामुळे त्यांच्या विचारांचे अनुसरून करणारे तर दुरच. 
            मला वाटते अण्णाभाऊंनी मातंग समाजाला खरा आणि एकमेव संदेश आपल्या गितातून दिलेला आहे. त्या संदेशालाच मातंग समाजाने मातंग समाजाचे , चळवळीचे संविधान बनवायला हवे. तो संदेश म्हणजे " जग बदल घालुनी घाव" हे गीत. मातंग म्हणजे हत्ती आणि ऐरावत म्हणजे हत्ती. या गितातील ऐरावत म्हणजे मातंग समाज आहे आणि मला म्हणजेच माझ्या मातंग समाजाला हे अण्णाभाऊंना अपेक्षित आहे. जग बदल घालुनी घाव म्हणजेच जग आहे तसे न स्विकारता त्याच्या समोर लोटांगण न घालता, त्याला शरन न जाता त्याच्यावर घाव घालून जगाशी संघर्ष करून ते बदलायला हवे. गेले सांगून मला भिमराव जग बदलायचे त्यावर घाव घालायचा कसा, हे कुणी सांगितले तर भिमरावाने सांगितले. मग कसा घाव घालायचा व जग कसे बदलायचे हे सुध्दा भिमरावानेच सांगितले. म्हणुन भिमरावाने जे सांगितले ते सर्व वाचले पाहिजेत व त्याप्रमाणे जगावर घाव घालून ते बदलायला हवे. गुलामगिरीच्या चिखलात या ओळी स्पष्ट सांगतात मातंग समाजाचे जिवन हे स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य म्हणजे मनाप्रमाणे जगने. मात्र समाजाची परिस्थिती अतिशय हालाखीची आहे. त्यामुळे मनाप्रमाणे जगता येत नाही तर जग ज्या प्रमाने जगवते त्या प्रमाने जगावे लागते ही गुलामगिरी आहे. हा गुलामगिरीचा चिखल आहे. घृणास्पद परिस्थिती आहे या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मातंग समाज म्हणजे ऐरावत आणि ऐरावतही म्हणजे फक्त साधासुधा हत्ती नाही.तर राजाचा हत्ती. एकावेळी राजसत्ता असलेला मातंग. समाज या गुलामगिरीच्या चिखलात का रुतून बसला आहे? अंग झाडुनी निघ बाहेरी ... अंगामध्ये प्रचंड बळ आहे. परंतू ज्याला तू पाणी समजतोय तो चिखल आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. अंगावरचा हा चिखल ही अगतिकता, नकारात्मक मानसिकता झटकून टाका बाहेर या आणि बिनीवरती घाव घाला. " बिनीवरती घाव " हा शब्द खुप सखोल आहे. बिनीवरती म्हणजे शत्रू शोषक ज्या प्रमाने बिन वाजवतात त्याप्रमाने आपन डोलतो. त्या प्रमाने आपन वागतो. आपले शत्रू आपले शोषक ज्या इशाऱ्यावर आपल्याकडून कृती करून घेऊ इच्छितात परंतू आपल्याला गुलामगिरीतच ठेवतात. त्याच्या ईशाऱ्यावर बोलने कृती करने सोडुन त्यावर धावा बोलला पाहिजेत. हि बीन राजसत्ता, संघटना, इतिहास , वैचारिक मार्गदर्शन, संस्कार स्वरूपात आजही आहे. त्या बिनीवरती धावा बोलायचा म्हणजे शत्रुच्या संघटना प्रमाने  कृती करने सोडले पाहिजेत.ते सांगतात तो इतिहास नाकारला पाहिजेत. त्यांचे वैचारिक मार्गदर्शनाचे हस्तक होता कामा नये. त्यांचे संस्कार जे जातीय भेदभाव करणारे आहेत ते न स्विकारता त्याच्या विरोधात धाव घेतली पाहिजेत. आजच्या काळात शत्रुची बिन म्हणजे मेडियाच आहे. त्यांनी सुध्दा जातीय संस्कार सोडावेत यासाठी जग बदलायलाच हवे. घाव घालायलाच हवेत. 
           आमचे शत्रू कोण आहेत, आमचे शोषन  कुणी केले हे अण्णाभाऊ पुढिल ओळीत सांगतात. धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले या त्या ओळी आहेत. भांडवलदार व धर्मांध विचारसरणी ह्या मातंग समाजाच्या शत्रू आहेत.ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे पुन्हा पैसे जातील.धनवंत संपत्तीवर डल्ला मारून बसल्यावर संपत्तीचे समान वाटप न होता विषम वाटप होईलच . मग त्यातून समाजाची पिळवणूक होत आलेली आहे. धनवंत ठरवतील त्याप्रमाणे, त्या मजुरीवर , ते काम करावे लागते. काल बाळंतपण करणारी मातंग स्त्री एक पायली ज्वारी घेत होती तर तीच डिलेवरी आज दवाखान्यात होते त्याचे आज हजारो रुपये घेतात. योग्य मोबदला न देता मातंग समाजाची पिळवणूक होत आलेली आहे तर धर्मांध सुध्दा तसेच छळले आहे. त्यांनी सुध्दा सामाजिक जिवनातून पुर्णतः उधवस्त केले आहे.आजही धर्मांध मातंग समाजाच्या विरोधात षडयंत्र करतात. मात्र समाजाच्या ते लक्ष्यात येत नाही.चोर झाले साव या ओळीत अण्णाभाऊ म्हणतात धर्मांध व भांडवलदार वास्तविक पाहता हे चोर आहेत तेच सभ्य पणाचा आव आणत आहेत. मुळ देशाचे मालक आपन आहोत. आपन इथले मुळ निवासी आहेत. इथले राजे आहोत. ईथल्या संपत्तीचे मालक आहोत. पण बाहेरून आलेले हे आर्य चोर आहेत तेच न्याय करणारे झालेत. अण्णाभाऊंचा इतिहासाचा अभ्यास व्यापक दिसून येतो. कदाचित बाबासाहेबांनी सांगितलेल्या  इतिहासाने अण्णाभाऊंना प्रभावित केले आहे. नाहीतर चोर झाले साव असे अण्णाभाऊंनी म्हणण्याचे तात्पर्य काय असावे?  ठरवून आम्हा हिन कलंकीत , जन्मोजन्मी करून अंकीत या ओळी वरून स्पष्ट कळते आहे कि हे गीत मातंग समाजासाठीच आहे.कदाचित संपुर्ण दलितांसाठी आहे. मातंग समाजासाठी संदेश आहे. इथल्या धर्माने व्यवस्थेने आम्हाला हिन ठरवले कलंकीत केले अपमानीत केले.मनुस्मृती व सर्व धर्म ग्रंथात मातंग समाजाला अपमानीत केले आहे. त्यांचे सर्व अधिकार नाकारले आहेत. अण्णाभाऊंना यांचे शल्य बोचत आहे हे जाणवते आहे.
जन्मोजन्मी आमच्यावरच गुलामगिरीचे जिवन लादले. आमच्यासोबत भेदभाव केला. मात्र ज्या सर्वांसोबत हा भेदभाव केला. त्यांनी एकजुटीच्या रथावर आरूढ होऊन पुढे चालावे. रथ युध्दासाठी  वापरायचे तर संघर्ष करतांनी ज्या सर्वांवर अन्याय झाला त्यांनी लढण्यासाठी एकजुट व्हावे. सर्व दलितांनी एकजुट व्हावे ही अण्णाभाऊंची अपेक्षा आहे. अण्णाभाऊंच्या खऱ्या वारसदारांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तरच अण्णाभाऊंचे नाव घेण्याचा त्यांना हक्क आहे. अण्णाभाऊंचा जिवन संघर्ष व त्यांचे साहित्य हा समाजासाठी संदेश आहे. त्याचप्रमाणे राज्घयटनेची प्रस्तावना राज्यघटनेचा आत्मा आहे. त्या प्रमाणे जग बदल घालून घाव हे गीत अण्णाभाऊंच्या साहित्याचा आत्मा आहे. अण्णाभाऊ साठे ची जयंती फक्त धार्मिक सोहळ्यांसारखी साजरी न होता. फक्त भाषणबाजी न होता . अण्णाभाऊंना अपेक्षित समाज तयार व्हावा. यासाठी कृतीशील प्रयत्न व्हायला हवेत. जागतिक दर्जांच्या त्यांच्या विचारांना समजून घेतांना मार्क्स , डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य सुध्दा वाचायला हवे. म्हणजे अण्णाभाऊंना साहित्याच्या माध्यमातून काय म्हणायचे आहे तेव्हाच अर्थबोध होईल. अन्यथा फक्त करमणुकी पुरतेच साहित्य मर्यादित होईल. 
  जग बदल घालुनी घाव । सांगुन गेले मला भिमराव ।
गुलामगिराच्या या चिखलात । रुतुन बसला का ऐरावत ।
अंग झाडुनी निघ बाहेरी । घे बिनीवरती धाव ॥
धनवंतानी अखंड पिळले। धर्मांधानी तसेच छळले।
मगराने जणू माणिक गिळले। चोर जाहले साव ॥
ठरविन आम्हा हिन कलंकित । जन्मोजन्मी करुनी अंकीत ।
जिणे लादले वर अवमानित । निर्मुन हा भेदभाव ॥
एकजुटीच्या या रथावरती । आरूढ होउनी चल बा पुढती ।
नव महाराष्ट्रा  निर्माणू जगती । करा प्रकट निज भाव ॥         अण्णाभाऊंच्या जन्म शताब्दी वर्षाच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.                                   रूपराव देवराव नाटेकर
                                9823453275

बुधवार, २७ मे, २०२०

समाजात जाती तोडो आंदोलन मोठ्या प्रमाणात व्हावीत.

आदरनीय गुरूजी सर्व. तायप्पा तात्याबा कांबळे यांच्या जयंतीनिमित्त फेसबुकवर दिलेली प्रतिक्रिया.

आजपर्यंत मातंग समाजाच्या पोटजातीतील एकही व्यक्ती भेटला नाही. मांग गारुडी समाजातील प्रथा, परंपरा, इतिहास जाणुन घेण्याची खुप इच्छा आहे. मांग किंवा मांग गारुडी असे भेद कुणी मनातही आणायला नकोत. होलार मांग, मांग बुरुड असे भेदही मनात आणायला नको. पुर्ण दलितपिडीत समाज एक आहेत. हि भावना सर्व महापुरुषांची होती. अण्णाभाऊंच्या लेखनातून सुध्दा जानवते कि त्यांनी सर्व उपेक्षित जाती जमातीतून नायक उभे केले. त्यांचा जीवन संघर्ष लोकांसमोर मांडला. दुर्दैवाने मांग, महार, चांभार ,भंगी , कैकाडी या अनुसूचित जाती मध्ये बंधुत्व निर्माण झाले नाही. बंधुत्व निर्माण करणाऱ्या चळवळी निर्माण झाल्या नाहीत. तसे प्रयत्न करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसत नाहीत. नाहीतर सर्व जातीव्यवस्थेने अपमानीत केलेल्या जाती एकत्रीत आल्या असत्या तर मोठा निर्णायक समुह तयार झाला असता. पण जातही गोष्ट इतक्या सखोल रुतली आहे की जातीय वर्चस्व प्रस्थापित करतांना कुणी जाती जोडायला हव्यात हा प्रयत्नही करत नाहीत. बौध्द धर्म डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हाच प्रयत्न होता. बौध्द धर्म काही प्रमाणात धर्म न राहता एक जात झाल्यासारखी झाली. ब्राम्हण, क्षत्रियजाती, बनीया मोठ्या प्रमाणात एक येत आहेत. जातीमुळे जन्मतः मिळणारा मानसन्मान टिकुन राहण्यासाठी जातीयव्यवस्था टिकून राहण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. पण जातीव्यवस्थेने आपल्या ला अपमानीत केले आहे. आपल्याला आजही तुच्छ लेखल्या जाते . जातीव्यवस्था ही मोठी समस्या आहे. हे मान्य करण्यास ही एक मोठा वर्ग तयार नाही. बौध्द आंबेडकर वादी आपले शत्रू नाहीत जातीयवाद आपला शत्रू आहे, हे सांगूनही कळत नाही. सवर्णामध्ये मी मातंग आहे असे सांगताच मोठा मानसन्मान मिळतो असे मी बघितले नाही. जेव्हा गावाकडे भांडने होतात तेव्हा मांगाच्या पोटच्या अश्या खालच्या पातळीवर शिवी दिली जाते. मांगाच्यापोटी जन्म घेने ही जरी इतरांसाठी शिवी आहे मात्र आमची वास्तविकता आहे. आपन ज्यांना जन्म दिला आहे त्यांना जन्मतः एक शिवीस्पद जिवन दिले आहे. जर आल्यापोटी पैदा होणाऱ्या पोरांना आपन सन्मान देऊ शकत नसेल तर त्यांना जन्मही का द्यावा? आपन जन्म दिलाच आहे तर जातीपातीच्या गटारातून मुक्त करण्यासाठी संघर्ष केला पाहीजेेेत. ख-या अर्थाने तायप्पा गुरुजीना खरी आदरांजली ठरेल

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

मातंग समाजाने किती दिवसं माता, भगीनी, मुलीवर होणारे बलात्कार बघायचे?

संगिता कांबळे प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा सिल्लोड तालुक्यातील डोंगरगावामध्ये ३२ वर्षीय महिला व ७ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून ठार मारल्याची बातमी व्हाटस आप ग्रुपवर आली. संपुर्ण मानवजातीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. ज्याच्या कुणाच्या घरात आई बहीण मुलगी असेल त्या प्रत्येकाला हळहळ वाटल्याशिवाय राहणार नाही. रक्त उसळल्याशिवाय राहणार नाही. फक्त जातियवादाने ओतप्रोत भरलेल्या नीच विचारधारेच्या लोकांनाच वाईट वाटणार नाही. दोन दिवसापुर्वी म्हणजे शनीवारला २२ फेब्रुवारीला आई मुलगी शेतामध्ये गवत आणण्यासाठी गेल्या होत्या. त्या परत आल्याच नाहीत. म्हणुन हरविल्याची तक्रार पोलीस स्टेशनला रितसर नोंदवीली होती.पोलीसांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. आज त्या आई मुलीचं प्रेत विहीरीमध्ये आढळून आले. अतिशय क्रृरपणे बलात्कार करुन त्यांना ठार मारण्यात आले प्रथमदर्शनी तर असंच दिसतं आहे. दोघींचे जीभ बाहेर आलेली, डोळे बाहेर आलेले, गुप्तांगात काड्या टाकलेल्या. विकृत मानसिकता असलेल्या लोकांचेच हे काम असावं. इतर दुसर्ऱ्या समाजातील मुलगी असती तर संपूर्ण महाराष्ट्रात हल्लकोळ निर्माण झाला असता. पण मातंग समाज सुध्दा माणुस आहे. या देशाचा घटक आहे. हिंदू धर्माचाच हिस्सा आहे. म्हणुन ना कोणता भारतीय धावून येतो. ना कुणी हिंदू .विहीरीतील प्रेत सुध्दा कुटूंबीयांनीच बाहेर काढले आणि घरातील मंडळीनीच बाजेवर टाकुन विहीरीपासून घरापर्यंत आणले. ना देशातील अम्बुलेन्स धावून आली. ना देशातील पोलीस यांनी विहीरी बाहेर प्रेत काढले. ना एखादी हिंदू धर्मातल्या धर्मादाय संस्थेची गाडी आली.
        वय वर्ष सात व त्या मुलीवर बलात्कार  म्हणजे पशू सुध्दा असं काही करत नाही. खरच आपण माणसांच्या सभ्य समाजात राहतो. की कपडे घातलेल्या नराधमांच्या. खालील फोटो हा त्या मुलाचा आहे. जो आपल्या आई बहीणीच्या पोस्टमार्टम नंतर प्रेताची वाट पाहतोय.

उद्या  असं आई बहीणीवर बलात्कार होऊन बघत राहण्यापेक्षा समाजातील लोकांनी आजच अन्याया विरूध्द लढत लढत मरायला हवे. लाखोंचे हजारांचे  मोर्चेचे काढुन बलात्कार थांबले  नाहीत. मोर्चाची भीती बलात्कार करणारांना वाटत नसते . मोर्चा शासनाला समाजातील असंतोष दाखवण्यासाठी होत असतो. शासनाला भितीवाटते  की मोर्चा तील लोक यांच्याकडे दुर्लक्ष केले तर ते नाराज होऊन आपल्या विरोधात मतदान करतील. पण आजकाल समाज कितीही नाराज असला तरी निवडणुकीत ती नाराज एकगठ्ठठा मते कुठेच दिसत नाही. त्यामुळे समाजाच्या मोर्चाना शासन किंमत देत नाही. यावेळी मायावतीजींचे वाक्य आठवते "वोटो को बेचना मॉ बहनो की इज्जत बेचने के समान है" जर मतं विकले जात असतील तर समाजाच्या मोर्चाला  कोणी किंमत देणार नाही.
                               मोर्चाला जमा होणाऱ्या लोकांनी गाडीभाड्याचे पैसे वर्गणी म्हणुन दिले आणि त्या पैशातून तरूण मुलामुलींसाठी व्यायामशाळा काढली निडर , बलवान मुले-मुली गावात तयार झाले तर नक्किच अन्याय अत्याचार कमी होतील. हजारो मोर्चा पेक्षा आजुबाजुच्या दहा गावातून दहा झुंजार लोक तयार होऊन जर एक होऊन अन्याय करणाराचा वचपा काढतील. तर नक्कीच अन्याय अत्याचार कमी होतील. "शंभर वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस सिंह होऊन जगा" बाबासाहेबांनी सांगितलेले आहेच. समाजातील लोक मरणाची भिती सोडून लढत नाहीत तोपर्यंत अन्याय अत्याचार कमी होत नाही. पोलीसांकडून , शासनाकडून संरक्षणाची न्यायाची अपेक्षा करने खुप झाले. आता आपल्या मधूनच फकीरा, उमाजी नाईक उठून उभे राहिले पाहिजेत. तसे संस्कार येणाऱ्या पिढ्यांना दिले पाहिजेत. 
         समाजातील काही लोकांनी लढत लढत मेल्याशिवाय भावी पिढीला ईज्जत सुरक्षित ठेवून जगता येणार नाही. आई बहीणीं , मुलींच्या इज्जती वर हात टाकू पाहणारे हात ओळखुन वेळीच छाटले पाहीजेत. त्या दृष्टीने समाज प्रशिक्षीत झाला पाहीजेत. अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्या तील पात्र अन्याय सहन करत नाहीत. अण्णाभाऊ साठे यांना सुध्दा भेकड नाही तर लढवय्या समाज अपेक्षीत होता. 
मातंग समाजातील मुलीबाळीवर झालेल्या अन्यायाचा बदला घेतला गेला तरच अन्याय अत्याचार थांबतील.

तरुणांनी फक्त व्हाटस अप, टिकटाॅक, फेसबुकवर शूर होण्यापेक्षा रक्तातील पुर्वजांचा शुरपणा प्रत्यक्ष जीवनात आणायला हवा. "नडला त्याला तोडला " फक्त व्हाटस अप, फेसबुकवर पोस्ट टाकणारांनी खरोखरच जर प्रत्यक्ष जीवनात एखाद्या बलात्कारी तोडला तर समाजाची मान गर्वाने ताठ होईल. पोचिराम कांबळे यांच्या मुलांनी बापाच्या हत्येचा बदला घेतला.  त्या चंदर कांबळे चे नाव दलीत समाजाच्या इतिहासात अमर होईल. त्यांचा इतिहास समाजासमोर आला पाहीजेत. सांगण्याचे मतीतार्थ अन्याय करणारांना जोपर्यंत त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्या जात नाही तोपर्यंत अन्याय थांबणार नाहीत. सर्व मिळून चर्चा करून एक रणनीती ठरवायला हवी. सर्वच सोशल मेडीयात नाही लिहीता येणार. प्रत्यक्ष भेटीत नक्किच बोलू. 

रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०

मातंग समाजातील सिल्लोड जळिता मृत संगिताताई कांबळे साठी महाराष्ट्र का पेटला नाही?

2 फेब्रुवारी 2020 रोजी व 3 फेब्रुवारी 2020 रोजी महाराष्ट्रात दोन समान घटना घडल्या सिल्लोड येथे 2 फेब्रुवारी रविवारला सिल्लोड तालुक्यातील अंधेरी या गावी संगीता कांबळे या मातंग समाजाच्या महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला व तिने नकार दिल्यामुळे तिला पेट्रोल टाकुन पेटवण्यात आले.   त्यामध्ये ती 95% जळाली व नंतर तिचा मृत्यू झाला. 03 फेब्रुवारीला अंकिता पिस्सुडे या मुलीला हिंगणघाट येथे पेट्रोल टाकुन  जाळण्यात आले. त्यामध्ये ती 40 टक्के जळाली व नंतर तिचा मृत्यू झाला. या दोन्हीही घटना भिषण आणि लाजिरवाण्या आहेतच . दोन्ही आरोपींना कठोर शासन व्हायलाच पाहिजेत. पण या दोन्ही घटनेमुळे जातीयवादाचा लपलेला महाराष्ट्रातील चेहरा समोर आला. भाडखाऊ मेडीयाची छिनालवृत्ती दिसून आली. जात पाहून हळहळणारे समाजमन, जात पाहून संतप्त होणारे मानवतावादी पुढे आले. संगिता कांबळे हे नाव मेडीयात कुठेच नव्हते तर अंकिता ज्याची त्याची ताई झाली होती. कुठेतरी फक्त मातंग समाजाचे चार दोन कार्यकर्ते , त्यांच्या संगठना  संगिताताई साठी झटत होत्या तर अंकिता साठी सर्व स्तरावर सोशल मेड़िया, न्युज पेपर मधुन आग ओकल्या जात होती. अगदी फेसबुकवर राष्ट्रिय स्तरावरून प्रतिक्रिया येत होत्या. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील साहेब यांनी संसदेमध्ये संगिताताई साठी आवाज उठवल्यानंतर तर संपुर्ण देशाला माहीत पडले की संगीताताई कांबळे यांना सुध्दा जाळून टाकण्यात आले आहे तरी सुध्दा अंकीतासाठी लिहीण्यात येणारे लेख, पोस्ट यांची दिशा संगीताताई कडे वळली नाही. नितीन राऊत या मंत्री महोदयांनी अंकीता ताईचा संपुर्ण मेडिकल खर्च सरकार उचलणार जाहीर केले. पण संगिताताई बद्दल त्यांना शब्दही माहीत नसावा त्यामुळे ते बोलले नसावे. अंकिता ताई यांच्यावर काय उपचार सुरू आहेत. कुठुन कुठे हलवले यावर मेडीयातून भरपुर छापुन येत होते मात्र संगिताताईचा मृत्यू झाल्यानंतरच व्हाट्स अपवर मातंग समाजाच्या ग्रुपवर पोस्ट आली आणि माहीत पडले कि संगिताताई कांबळे मातंग समाजाची महीलेला जाळून टाकून मारण्यात आले. 
                           अंकीताच्या मृत्यू अगोदर तीन दिवस अगोदर संगिताताईचा मृत्यू झाला होता तेव्हा महाराष्ट्राचे समाजमन हेलावले नाही. मात्र संगिताताईच्या मृत्यूवेळी घेनदेन नसणारा मेडीया मात्र अंकिताताईच्या मृत्यूवेळी मात्र प्रचंड भावनीक झाला. सर्व स्तरावरून अंकिताच्या मारेकरी याला फाशी द्या त्याला एन्काउंटर करुन मारून टाका. घश्याला कोरड पडेपर्यंत मागणी होत होती पण संगिताताईचा मारेकरी यांचे नाव ही कुणाला माहीत नव्हते. सारखेच कृत्य करणारे मारेकरी असतांनी एकासाठी एक न्याय व दुसर्याच्या
 साठी एक न्याय का? संगीताताईच्या मारेकऱ्यांने तर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. सारं काही ठरवून पध्दतशीरपणे प्लॅन आखुन केले होते. तर अंकिताच्या मारेकऱ्यांने वेळेवर गाडितील पेट्रोल काढुन अंगावर ओतले होते. मग अंकीताचा मारेकरी विवेक नगराळे बौध्द आहे म्हणुन त्याचे एन्काऊंटर करा व संतोष मोहीते मराठा आहे म्हणुन त्यांचा निषेध सुध्दा करायचा नाही. ही जातियवादी मेडीयाची व समाजातील पांढरपेश्या निषेध करणारांची मानसिकता प्रचंड विकृत आहे. या मानसिकतेचे लोक कुलदीप सेंगर प्रकरणात उन्नाव घटनेतील पिडीता जेव्हा जाळुन टाकली तेव्हा का षंढ होऊन पाहत होते? मेडीया तेव्हा का षंढ झाली होती?  मग फक्त  अंकिता प्रकरणाला युगानुयुगा नंतर घडलेली घटना मेडीयाला का वाटते आहे? 
            अंकीता प्रकरणांमध्ये ओरडणारे जर प्रामाणिक असते तर त्यांना संगीताताईच्या प्रकरणाचे सुध्दा वाईट वाटले असते. जर अंकितामध्ये त्यांना ताई दिसली असती संगितामध्ये सुध्दा त्यांना ताईच दिसली असती. पण शंका आहे कि अंकिता प्रकरणांमध्ये रस्त्यावर उतरलेली मंडळी आणि मेडीया आसिफा प्रकरणांमध्ये आरोपीच्या समर्थनार्थ उतरलेली मंडळीतील काही मंडळी एकच आहेत. या प्रकरणात आपली पोळी भाजून घेत आहेत. आरोपीची आणि पिडीताची जात बघुन घटना व्हायरल केल्या जात आहे. ज्यामुळे दोन्ही समाजात संघर्ष निर्माण व्हावा. मात्र संगिताताईचे प्रकरण व्हाईरल यासाठी होत नाही की यांचा फायदा जातीयवादी संघटनांना होत नाही. दोन्ही प्रकरण जर व्हाइरल झाले तर लोकांच्या लक्ष्यात येईल कि गुन्हेगारांना जात नसते. पण अंकिता प्रकरणात तर फक्त गुन्हेगारांची जात दाखवायचा प्रयत्न केल्या जात आहे. तर संगिता ताईच्या घटनेत गुन्हेगाराची जात व प्रत्यक्ष गुन्हेगारालाच लपवलेल्या जात आहे.
      देशामध्ये देशद्रोही, भ्रष्टाचार, आतंकवादी घटना, बलात्कार या गुन्ह्यांमध्ये दलीतांचे प्रमाण अत्यल्प आहे. मोठमोठ्या करोडोच्या भ्रष्टाचारात व देशद्रोही घटनांमध्ये तर ते शुन्य आहे. एकुन बहुजन समाजाचे प्रमाणच शुन्य आहे. मात्र ज्या क्षुल्लक घटनांमध्ये जर आरोपी दलित असेल तर त्या घटनेला खुप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन दलीत समाज त्यांची समानतावादी विचारधारा, त्यांचे महापुरुष यांना टारगेट  केल्या जात आहे. अंकीता प्रकरणांमध्ये सुध्दा फेसबुकवर छुप्या पध्दतीने हे केल्या जात आहे. या प्रकारे प्रेमप्रकरणातून हत्या केल्या गेल्याचे हे प्रकरण एकमेव नाही. या प्रकारचे कित्येक प्रकरनं यापुर्वीसुध्दा झाले आहेत. निर्भया किंवा हैदराबाद प्रकरणा इतकी  गंभीरता या प्रकरणाला का दिली जात आहे. मातंग समाजाच्या मातंग समाजाच्या नांदेड येथील चिमुकल्या विद्यार्थिनी पासुन तर संगीता कांबळे सारख्या महिलेसोबत अत्याचार होतात. मातंग समाज रस्त्यावर उतरतो तेव्हा मेडीयात हे प्रकरने का गाजत नाहीत.तेव्हा आज रोजी ट्रोल करणारी गॅंग कुठे असते? का न्याय मिळेपर्यंत प्रकरण मेडीयात राहत नाही.   
             विवेक नगराळे विरूध्द उज्वल निकम यांना लावण्यात येते. संगिता कांबळे कींवा इतर मातंग बघिनी यांच्या मारेकऱ्यांना अटक करा म्हणुन मोर्चा काढावा लागतो. मातंग समाजातील माझ्या बांधवांना मला हेच सांगायचे आहे. मेडीया हे मनुवाद्यांचे एक हत्यार आहे आणि ते पध्दतशीरपणे बहुजन समाजाविरोधात वापरले जाते हे साहेब कांशीरामजी सांगायचे. आपल्या विरोधातील अन्यायाविरुद्ध आपल्यालाच लढावे लागेल. मनुवादी मेडिया मदत करणार नाही. मनुवादी व्यवस्था उलथून टाकल्याशिवाय अन्याय अत्याचार ही थांबणार नाहीत. मनुवादी व्यवस्था उलथविण्यासाठी संपुर्ण दलीत, ओबीसी, आदिवासी यांना एकत्रीत यावे लागेल.
 फक्त मोर्चाने समश्या सुटत नसतात. तर समश्या केव्हा सुटते हे फुले, शाहू , आंबेडकर, अण्णाभाऊ, कांशीराम यांनी सांगितले आहे. संगिताताईला न्याय मिळेल की नाही माहीत नाही. मातंग समाजामध्ये आणखी दुसरी संगिता कांबळे होऊ नये यासाठी मुळापासून तयारी करावी लागेल. त्यासाठी मातंग समाजाने मेडियातील बातम्या वाचून आपली वैचारिक भुमिका न ठरवता मानवतावादी विचारधारेचा असल्यास करून तसे संस्कार येणाऱ्या पिढ्यांना दिले पाहिजेत. आपल्या प्रत्येक समश्येच्या मुळाशी जातीयवाद आहे हे लक्ष्यात घेतले पाहीजेत. प्रत्येक समश्येवर उपाय आहे. मात्र तो उपाय सोशल मेडीयावर न बोलता, न सांगता प्रत्यक्ष चर्चा करून समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून केडरकॅंपद्वारे  उपाय योजना  सांगता येईल. त्यासाठी लवकरच सर्वांनी केडरकॅंपच्या माध्यमातून भेटण्याचा प्रयत्न करत आहे.
               


सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०

मांग किंवा मातंग समाजाच्या जागतीक इतिहासातील काही गौरवास्पद संदर्भ

मातंग किंवा मांग म्हणुन ओळखल्या जाणारा मातंग समाजाचा गौरवशाली इतिहास जागतीक ऐतिहासिक घडामोडींना स्पर्श करणारा आहे. ऐकेकाळी भारताच्याच नव्हे तर जगाच्या प्राचीन इतिहासावर प्रभाव असलेला मातंग समाज होता. यांचे अनेक संदर्भ वेळोवेळी सापडतात. मात्र त्याच्याकडे इतिहास या दृष्टिकोणातून बघितल्या जात नाही. मातंग समाजातील घराघरात पुर्वजांकडून चालत आलेली माहीती व संस्कार आहेत यामध्ये सर्वांकडुन हे बिंबवीले जाते आपण खुप महान आहोत. आपला वंश खुप महान आहे. वास्तविक परिस्थीती मध्ये मात्र हे कुठेच दिसत नाही. मातंगा व्यतिरीक्त कुठलाही अन्य समाज मात्र याला दुजोरा तर देणार नाहीच उलट त्यांना ह्या सर्व बाबी हाश्यास्पद वाटतील. मातंग सर्वाधिक तुच्छ समजण्याचे अनुभवच सर्वांकडे आहेत. स्वत: मातंगाला हे सांगता  येणार नाही आमचा इतिहास कसा महान आहे. यांचे पुरावे त्याला देता येणार नाहीत. मातंग समाज ज्या दृष्टिकोणातून स्वत:कड़े बघतो तोच दृष्टिकोन मातंग समाजाच्या शत्रूनी निर्माण केलेला आहे. आपली महानता भारतीय समाजावर बिंबवण्यासाठी ज्या ग्रंथाची, मुल्यांची  निर्मीती ब्राम्हणांनी केली मातंग समाज सुध्दा आपला इतिहास त्याच ग्रंथामध्ये, मुल्यांमध्ये  शोधण्याचा प्रयत्न करतो. मात्र मातंग समाजाने जैन, बौध्द, ख्रिश्चन, पारसी यांच्याशी निगडीत साहीत्य तपासले तर मातंग समाजाचा जाज्वल्य इतिहास बाहेर पडतो. 
                मातंग समाजाचा भव्यदिव्य इतिहास जगातील कोणीच नाकारू शकत नाही त्याचा पुरावा स्पष्टपणे बायबलमध्ये सापडला आहे. 'मातंग' हां शब्द अलीकडे मांग संदर्भात मोठ्या प्रमाणात वापरला जातो  मात्र फुलेंच्या काळापर्यंत किंवा अण्णाभाऊंच्या काळापर्यंत मातंग शब्दापेक्षा 'मांग' म्हणुनच सर्वत्र उल्लेख आहे. अण्णाभाऊंच्या साहीत्यात ' मांग' हां शब्दच मोठ्या प्रमाणात आहे. मातंग हा शब्द अण्णाभाऊंच्या प्रचंड मोठ्या  साहीत्यात सापडने दुर्मिळच . नंतरच्या अगदी अलिकडे मोठ्या प्रमाणात 'मातंग' या शब्दाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. मात्र मांग किंवा मातंग हे शब्द समानार्थीच आहेत. महाभारतात मतंग हां शब्द अस्पुश्याशी संबंधीतच येतो. जातक कथांमध्ये मातंग हा शब्द बुध्दाचा पुर्वजन्मातील एक जन्म ज्या जन्मातील  नाव मातंग आहे तो सुध्दा शुद्र किंवा हलक्या जातीचा म्हणुनच येतो. चांडाळ, मातंग, मांग, मेघ,मेग, माग, मंग, मग्ग अश्या अनेक उच्चार असलेला संबोध मातंग समाजाशीच संबंधीत आहे. दहा हजार वर्षाच्या इतिहासात अनेक सुक्ष्मसे बदल आपल्याला विवीध काळामध्ये बघायला मिळतात.  
   आनंदाची गोष्ट म्हणजे बायबलमध्ये मातंग समाजाशी संबंधीत जो उच्चार सापडतो तो मागी कींवा मागस् , मेग म्हणुन आढळतो. Gosspels of Magi म्हणुन शतकोंशतके पाश्चात्य जगामध्ये चर्चा होते असते. ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा पुर्वेकडील देशामधुन तीन मागी आले. हे मागी कोण?  कुठल्या देशाचे? त्यांचे नाव? त्यांची संख्या ? यांचे अप्रुप सर्व पाश्चिमात्य जगाला वाटते. त्यावर सतत चर्चा होते असते. तुम्ही जर गुगल वर मागी , Three King of East, Three wise man असे सर्च केले तर त्या विषयी माहीतीचा खजिनाच बाहेर पडेल. अनेक पुस्तकें, चित्र, व्हीडीओज तुम्हाला सापडतील. अनेक लेखकांनी अनेक पुस्तकें लिहून आपले मत मांडले आहे. Magi हा अनेकवचन असलेला शब्द आहे. तर त्याचे एक वचन Magus मागस् किंवा मेगस कसा उच्चार होतो. दोन्ही उच्चार मातंग समाजाकडेच बोट दाखवतात. पुर्वेकडील देशामधून मांगी आलेत .ईस्त्राईलच्या   पुर्वेकडे राहणारा "मागी  किंवा माग हा एकमेव मातंग समाज आहे. कालही होता आजही आहे. ते पुर्वेकडून म्हणजे पार्शिया , अफगणिस्तान , भारत या देशामधून आले असावेत असे मत प्रवाह आहेत सर्व मते मान्य केले तरीही प्राचीन काळी भारताची सिमा या सर्व भुप्रदेशांना सामावून घेणारी होती. यांना  जर इतर देशाचे मानले तरी हे सिध्द होते की मातंग समाज भारतातच नव्हे तर इतर देशामध्ये सुध्दा होता हेच सिध्द होते. 
         मांगी ख्रिस्ताचे भविष्य सांगण्यासाठी बेथलेहेम  येथे जातात. मांगी म्हणजे कोण? मागी म्हणजे पुर्वैकडील देशाचे राजे म्हणुन त्यांचा उल्लेख होतो. मांगी म्हणजे फक्त व्यक्तीच जर असत्या तर  मोठे अप्रुप नसते. पण मागी म्हणजे पुर्वेकडील देशाचे राजे म्हणुन त्यांचा उल्लेख आहे. Their identification as kings in later Christian writings is probably linked to Isaiah 60:1–6, which refers to "kings [coming] to the brightness of your dawn" bearing "gold and frankincense".[5] 
या  मांगी ना " ख्रिस्ती जगामध्ये "तीन विद्वान" Three wise men आणि Three King of East  म्हणुन ओळखले जाते. ख्रिस्त काळामध्ये पुर्वेकडे मातंग समाज शासक होता  त्याचा पुरावा आहे. मांगी या शब्दाचा अर्थ King of East होतो.  मुळ बायबल मध्ये Magi  ऐवजी Magos  हां शब्द आहे .
मग वर उल्लेखीत मागी हे मातंगच होते याला पुरक ठरतील असे अनेक पुरावे संदर्भ सापडतात. येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबरला झाला आणि मागी हे 6 जानेवारीला त्यांना भेटले. म्हणजे ज्या रात्री मुलाचे बारसे करण्याची प्रथा भारतात आहे. त्याच रात्री येशू ख्रिस्तांना मागी भेटून भेटवस्तू देतात. बारश्याला नाव ठेवने, पाळना म्हणने, या प्रकारचा समारोह भारतात करतात.निदान  महाराष्ट्रात मातंग समाजासह सर्व बहुजन समाज करतो. त्याच बारादीला येशू ख्रिस्ताला मागी भेटतात. एका अर्थाने बारादी साजरी करतात. ख्रिस्ती जगामध्ये त्या प्रित्यर्थ आजही खुप ठिकाणी वेगवेगळ्या पध्दतीने तो दिवस साजरा केल्या जातो. त्या सणाला Ephiphany (Holiday) म्हणतात. काही ठिकाणी "ख्रिस्ताचा बाप्तीस्मा"(Baptisma of zesus) म्हटले जाते. काही वेळा Three kings day म्हटले जाते. काही ठिकाणी "तीन राजांचा केक " कापला जातो. मागीचे महत्त्व आपल्याला कळून येईलच आणि त्याचा भारतीय संस्कृतीशी असलेला संबंधही कळून येईल.
        तिन मागी  हे भविष्यशास्त्रात पारंगत होते. मातंग समाज सुध्दा भविष्यशास्त्रात पारंगत होता. भाडळी ही मातंग स्त्री भविष्यवेत्ता म्हणुन आजही ओळखली जाते. "सहदेव भाडळी " हा ग्रंथ आजही भारतातील ज्योतीष्य शास्त्रातील प्रसिध्द ग्रंथ आहे. त्यातील भाडळी ही स्त्री मातंग होती हे सर्वमान्य आहे. मात्र संपुर्ण ग्रंथच  हां मातंग समाजाशी संबंधीत आहे. मात्र सहदेव ब्राम्हण असल्याची कपोलकल्पीत कथा त्यामध्ये घुसडविण्यात आली. आणि भविष्यवेत्ता भाडळीला श्रेय मिळू नये म्हणून सुध्दा त्यामध्ये भाकडकथा घुसवून मातंग समाजातील ज्ञानाचे अवमुल्यन करण्यात आले. मातंग समाजातील मागधी भाषेतील ग्रंथ संपदा नष्ट करून मुळग्रंथाचे ब्राम्हणीकरन करून त्यामधील मातंग संस्कृती , इतिहास पुर्णत: नष्ट केला. व संस्कृतमध्ये पुनर्लेखन करून ब्राम्हणीश्रेष्ठत्व त्यामध्ये घुसडवीले. मात्र मुळत: या देशातील सर्वमान्य व श्रेष्ठ संस्कृती मातंग होती.  मागीच्या उल्लेखावरून  स्वरूपावरून दिसून येते. 
 मुळ बायबल मधील उल्लेख Magos आहे. लेटीन किंवा ग्रीक भाषेत Budha  चा उल्लेख Buddos असा केला आहे. त्यावरुन Mag चा उल्लेख Magos केला गेला आहे यात काही शंका नाही. Magos हा  शब्द समाज यांचा इतिहास अतिशय प्रचंड आहे. Magi  मागी हे पारशी लोकांच्या धर्मगुरूला सुध्दा म्हटले जाते. प्राचीन पारसी लोकांना सुध्दा मांगी म्हटले जाते. त्याची संस्कृती व संबंध सुध्दा मातंग समाजापर्यंत पोहचतो. माझे वैयक्तीक मत असे आहे की मुस्लीम, ख्रिश्चन, पारसी, हिंदू या आधुनिक धर्माच्या अगोदर जो धर्म जगात होता तो मातंग धर्म होता. मातंग समाज होता. या विषयी पुढील लेखात मी त्याविषयी लिहीणार आहेच. 
मागी पुर्वेकडील राजे हे मातंग होते या विषयी आणखी एक पुरावा बघू . मागीचे अनेक चित्र रेखाटले आहेत . त्याविषयी अनेक पुस्तकें लिहील्या गेली आहेत. मांगी हे मातंग होते हे सिध्द करणारा पुराना म्हणजे उपरोक्त तिन्ही मागीच्या हातामध्ये डफ वाजवतांनाचे चित्र आहे.

Adoration of the Magi from the East, Church Agaçalti, IX-XI centuries, Ihlara Valley, Aksaray, Cappadocia, Central Anatolia, 

- Image ID: एडोरेशन ऑफ मागी नावाचे नवव्या ते अकराव्यया शतका दरम्ययानचे जे चित्र आहे. त्यामध्ये तिन्ही मांगी डफ वाजवताना  दिसत आहेत. मागी हे मांग आहेत या पेक्षषा मोठापुरावा तो काय. 
    
    मांगी हे मातंग होते, ते विद्वान होते. मांगी हे पुर्वेकडील राजे होते. मांगी हे मातंगच होते हे सिध्द करणारा आणखी एक पुरावा  The Catholic Encyclopedia vol 9 New york: Robbert Appleton company 1910 2 may 2015 मध्ये Magi या शब्दाचा अर्थ Drum Walter  सांगितला आहे. म्हणजे ड्रम वाजविणारा सांगीतला आहे. मागी हे पुर्वेकडील राजांसाठी वापरला जाणारा शब्द. मांगी हे पुर्वेकडील राजे होते. मांग हेच मागी होते. व मांगी हेच पुर्वेकडील राजे होते. मागी जेव्हा बेथलेहेम ला गेले तेव्हा भारतात कोणाचे राज्य होते. यांचा शोध आपण घेतला तर तेव्हा भारतामध्ये महाजन पद होते असा उल्लेख इतिहासात आहे. महाजन पदे याच्या सखोल मध्ये गेल्यास महाजन पदे हे महाजन पदे नसून मांगजन पद आहेत हेच सिध्द होईल. कारण सम्राट प्रसेनजीत महाजन पदातील एक राजा होता. आणि तो मातंग होता. इतर महाजन पदावरील राजे त्याचे नातेवाईक होते. बंगाल , विदर्भ प्रांतावर त्याचे राज्य होते. अनेक राजे शुद्र होते. हे सर्व  मातंग वंशाशी संबंधीत आढळतात. त्यामुळे महाजन पदे नसून मांगजन पदे असावीत अशी शंका आहे. मांग हे पुर्वेकडील शासक होते यात शंका नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पुश्यता ही इ.स. सहाव्या शतकामध्ये सुरू झाल्याचे उल्लेख केला आहे. अस्पृश्य पुर्वी कोण होते? या पुस्तकामध्ये त्यांनी मातंग स्त्री, मातंग राजपुत्री चा संदर्भ देऊन अस्पृश्यता ही सहाव्या शतकापर्यंत नव्हती. तर अस्पृश्य हे काही ठिकाणी  राजे होते  हे सांगितले आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यासाठी जे उदाहरण दिले ते मातंग राजपुत्रीचे उदाहरण दिले आहे.महात्मा फुलेंनी स्पष्टच म्हटले आहे मांग हे शासनकर्ते आहेत. महात्मा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेला इतिहास वाचल्याशिवाय मातंग समाजाला राजांचे गुलाम कसे झालो हे कळणार नाही.