संगिता कांबळे प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा सिल्लोड तालुक्यातील डोंगरगावामध्ये ३२ वर्षीय महिला व ७ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून ठार मारल्याची बातमी व्हाटस आप ग्रुपवर आली. संपुर्ण मानवजातीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. ज्याच्या कुणाच्या घरात आई बहीण मुलगी असेल त्या प्रत्येकाला हळहळ वाटल्याशिवाय राहणार नाही. रक्त उसळल्याशिवाय राहणार नाही. फक्त जातियवादाने ओतप्रोत भरलेल्या नीच विचारधारेच्या लोकांनाच वाईट वाटणार नाही. दोन दिवसापुर्वी म्हणजे शनीवारला २२ फेब्रुवारीला आई मुलगी शेतामध्ये गवत आणण्यासाठी गेल्या होत्या. त्या परत आल्याच नाहीत. म्हणुन हरविल्याची तक्रार पोलीस स्टेशनला रितसर नोंदवीली होती.पोलीसांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. आज त्या आई मुलीचं प्रेत विहीरीमध्ये आढळून आले. अतिशय क्रृरपणे बलात्कार करुन त्यांना ठार मारण्यात आले प्रथमदर्शनी तर असंच दिसतं आहे. दोघींचे जीभ बाहेर आलेली, डोळे बाहेर आलेले, गुप्तांगात काड्या टाकलेल्या. विकृत मानसिकता असलेल्या लोकांचेच हे काम असावं. इतर दुसर्ऱ्या समाजातील मुलगी असती तर संपूर्ण महाराष्ट्रात हल्लकोळ निर्माण झाला असता. पण मातंग समाज सुध्दा माणुस आहे. या देशाचा घटक आहे. हिंदू धर्माचाच हिस्सा आहे. म्हणुन ना कोणता भारतीय धावून येतो. ना कुणी हिंदू .विहीरीतील प्रेत सुध्दा कुटूंबीयांनीच बाहेर काढले आणि घरातील मंडळीनीच बाजेवर टाकुन विहीरीपासून घरापर्यंत आणले. ना देशातील अम्बुलेन्स धावून आली. ना देशातील पोलीस यांनी विहीरी बाहेर प्रेत काढले. ना एखादी हिंदू धर्मातल्या धर्मादाय संस्थेची गाडी आली.
वय वर्ष सात व त्या मुलीवर बलात्कार म्हणजे पशू सुध्दा असं काही करत नाही. खरच आपण माणसांच्या सभ्य समाजात राहतो. की कपडे घातलेल्या नराधमांच्या. खालील फोटो हा त्या मुलाचा आहे. जो आपल्या आई बहीणीच्या पोस्टमार्टम नंतर प्रेताची वाट पाहतोय.
उद्या असं आई बहीणीवर बलात्कार होऊन बघत राहण्यापेक्षा समाजातील लोकांनी आजच अन्याया विरूध्द लढत लढत मरायला हवे. लाखोंचे हजारांचे मोर्चेचे काढुन बलात्कार थांबले नाहीत. मोर्चाची भीती बलात्कार करणारांना वाटत नसते . मोर्चा शासनाला समाजातील असंतोष दाखवण्यासाठी होत असतो. शासनाला भितीवाटते की मोर्चा तील लोक यांच्याकडे दुर्लक्ष केले तर ते नाराज होऊन आपल्या विरोधात मतदान करतील. पण आजकाल समाज कितीही नाराज असला तरी निवडणुकीत ती नाराज एकगठ्ठठा मते कुठेच दिसत नाही. त्यामुळे समाजाच्या मोर्चाना शासन किंमत देत नाही. यावेळी मायावतीजींचे वाक्य आठवते "वोटो को बेचना मॉ बहनो की इज्जत बेचने के समान है" जर मतं विकले जात असतील तर समाजाच्या मोर्चाला कोणी किंमत देणार नाही.
उद्या असं आई बहीणीवर बलात्कार होऊन बघत राहण्यापेक्षा समाजातील लोकांनी आजच अन्याया विरूध्द लढत लढत मरायला हवे. लाखोंचे हजारांचे मोर्चेचे काढुन बलात्कार थांबले नाहीत. मोर्चाची भीती बलात्कार करणारांना वाटत नसते . मोर्चा शासनाला समाजातील असंतोष दाखवण्यासाठी होत असतो. शासनाला भितीवाटते की मोर्चा तील लोक यांच्याकडे दुर्लक्ष केले तर ते नाराज होऊन आपल्या विरोधात मतदान करतील. पण आजकाल समाज कितीही नाराज असला तरी निवडणुकीत ती नाराज एकगठ्ठठा मते कुठेच दिसत नाही. त्यामुळे समाजाच्या मोर्चाना शासन किंमत देत नाही. यावेळी मायावतीजींचे वाक्य आठवते "वोटो को बेचना मॉ बहनो की इज्जत बेचने के समान है" जर मतं विकले जात असतील तर समाजाच्या मोर्चाला कोणी किंमत देणार नाही.
मोर्चाला जमा होणाऱ्या लोकांनी गाडीभाड्याचे पैसे वर्गणी म्हणुन दिले आणि त्या पैशातून तरूण मुलामुलींसाठी व्यायामशाळा काढली निडर , बलवान मुले-मुली गावात तयार झाले तर नक्किच अन्याय अत्याचार कमी होतील. हजारो मोर्चा पेक्षा आजुबाजुच्या दहा गावातून दहा झुंजार लोक तयार होऊन जर एक होऊन अन्याय करणाराचा वचपा काढतील. तर नक्कीच अन्याय अत्याचार कमी होतील. "शंभर वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस सिंह होऊन जगा" बाबासाहेबांनी सांगितलेले आहेच. समाजातील लोक मरणाची भिती सोडून लढत नाहीत तोपर्यंत अन्याय अत्याचार कमी होत नाही. पोलीसांकडून , शासनाकडून संरक्षणाची न्यायाची अपेक्षा करने खुप झाले. आता आपल्या मधूनच फकीरा, उमाजी नाईक उठून उभे राहिले पाहिजेत. तसे संस्कार येणाऱ्या पिढ्यांना दिले पाहिजेत.
समाजातील काही लोकांनी लढत लढत मेल्याशिवाय भावी पिढीला ईज्जत सुरक्षित ठेवून जगता येणार नाही. आई बहीणीं , मुलींच्या इज्जती वर हात टाकू पाहणारे हात ओळखुन वेळीच छाटले पाहीजेत. त्या दृष्टीने समाज प्रशिक्षीत झाला पाहीजेत. अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्या तील पात्र अन्याय सहन करत नाहीत. अण्णाभाऊ साठे यांना सुध्दा भेकड नाही तर लढवय्या समाज अपेक्षीत होता.
तरुणांनी फक्त व्हाटस अप, टिकटाॅक, फेसबुकवर शूर होण्यापेक्षा रक्तातील पुर्वजांचा शुरपणा प्रत्यक्ष जीवनात आणायला हवा. "नडला त्याला तोडला " फक्त व्हाटस अप, फेसबुकवर पोस्ट टाकणारांनी खरोखरच जर प्रत्यक्ष जीवनात एखाद्या बलात्कारी तोडला तर समाजाची मान गर्वाने ताठ होईल. पोचिराम कांबळे यांच्या मुलांनी बापाच्या हत्येचा बदला घेतला. त्या चंदर कांबळे चे नाव दलीत समाजाच्या इतिहासात अमर होईल. त्यांचा इतिहास समाजासमोर आला पाहीजेत. सांगण्याचे मतीतार्थ अन्याय करणारांना जोपर्यंत त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्या जात नाही तोपर्यंत अन्याय थांबणार नाहीत. सर्व मिळून चर्चा करून एक रणनीती ठरवायला हवी. सर्वच सोशल मेडीयात नाही लिहीता येणार. प्रत्यक्ष भेटीत नक्किच बोलू.