आदरनीय गुरूजी सर्व. तायप्पा तात्याबा कांबळे यांच्या जयंतीनिमित्त फेसबुकवर दिलेली प्रतिक्रिया.
आजपर्यंत मातंग समाजाच्या पोटजातीतील एकही व्यक्ती भेटला नाही. मांग गारुडी समाजातील प्रथा, परंपरा, इतिहास जाणुन घेण्याची खुप इच्छा आहे. मांग किंवा मांग गारुडी असे भेद कुणी मनातही आणायला नकोत. होलार मांग, मांग बुरुड असे भेदही मनात आणायला नको. पुर्ण दलितपिडीत समाज एक आहेत. हि भावना सर्व महापुरुषांची होती. अण्णाभाऊंच्या लेखनातून सुध्दा जानवते कि त्यांनी सर्व उपेक्षित जाती जमातीतून नायक उभे केले. त्यांचा जीवन संघर्ष लोकांसमोर मांडला. दुर्दैवाने मांग, महार, चांभार ,भंगी , कैकाडी या अनुसूचित जाती मध्ये बंधुत्व निर्माण झाले नाही. बंधुत्व निर्माण करणाऱ्या चळवळी निर्माण झाल्या नाहीत. तसे प्रयत्न करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसत नाहीत. नाहीतर सर्व जातीव्यवस्थेने अपमानीत केलेल्या जाती एकत्रीत आल्या असत्या तर मोठा निर्णायक समुह तयार झाला असता. पण जातही गोष्ट इतक्या सखोल रुतली आहे की जातीय वर्चस्व प्रस्थापित करतांना कुणी जाती जोडायला हव्यात हा प्रयत्नही करत नाहीत. बौध्द धर्म डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हाच प्रयत्न होता. बौध्द धर्म काही प्रमाणात धर्म न राहता एक जात झाल्यासारखी झाली. ब्राम्हण, क्षत्रियजाती, बनीया मोठ्या प्रमाणात एक येत आहेत. जातीमुळे जन्मतः मिळणारा मानसन्मान टिकुन राहण्यासाठी जातीयव्यवस्था टिकून राहण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. पण जातीव्यवस्थेने आपल्या ला अपमानीत केले आहे. आपल्याला आजही तुच्छ लेखल्या जाते . जातीव्यवस्था ही मोठी समस्या आहे. हे मान्य करण्यास ही एक मोठा वर्ग तयार नाही. बौध्द आंबेडकर वादी आपले शत्रू नाहीत जातीयवाद आपला शत्रू आहे, हे सांगूनही कळत नाही. सवर्णामध्ये मी मातंग आहे असे सांगताच मोठा मानसन्मान मिळतो असे मी बघितले नाही. जेव्हा गावाकडे भांडने होतात तेव्हा मांगाच्या पोटच्या अश्या खालच्या पातळीवर शिवी दिली जाते. मांगाच्यापोटी जन्म घेने ही जरी इतरांसाठी शिवी आहे मात्र आमची वास्तविकता आहे. आपन ज्यांना जन्म दिला आहे त्यांना जन्मतः एक शिवीस्पद जिवन दिले आहे. जर आल्यापोटी पैदा होणाऱ्या पोरांना आपन सन्मान देऊ शकत नसेल तर त्यांना जन्मही का द्यावा? आपन जन्म दिलाच आहे तर जातीपातीच्या गटारातून मुक्त करण्यासाठी संघर्ष केला पाहीजेेेत. ख-या अर्थाने तायप्पा गुरुजीना खरी आदरांजली ठरेल
खूपच चांगला विचार आहे महोदय.यासाठीच जाती जोडो अभियान सूरू आहेच. राजकिय प्लॅटफॉर्मवर फक्त बहुजन समाज पक्षाशिवाय इतर कोणत्याही पक्षाचा एजंडा नाही आहे. आपल्या हक्कासाठी देशात फक्त बसपातच "" जाती जोडो "" अभियान चालवित आहे. देशात बसपा लाच मजबूत करण्याची गरज आहे. बासाहेबांचे असलेले स्वप्न "" आम्हाला या देशाची शासन कर्ती जमात बनायचे आहे "" हे आंदोलन अन्नाभाऊ साठेंनी आपल्या साहीत्यातून प्रतिपादित केले आहे. त्याचा अभ्यास व्हा. गूरूजींना सादर आदरांजली.
उत्तर द्याहटवाप्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद,शासनकर्ते होण्यासोबत सामाजिक मुळे ( सोशल रुट) ही मजबुत होते आवश्यक आहेत.देशामध्ये बसपाशिवाय पर्याय नाही. बसपाबाहेरील राजकीय कार्यकर्ते यांची एकजुट होण्याचाही प्रयत्न व्हावा. वामन मेश्राम यांच्या सारख्या सम विचारी लोकांसोबत सुध्दा चर्चा व्हायला हवी.ज्यामुळे समाचाचे छोटेमोठे गट तयार होणार नाहीत
उत्तर द्याहटवा