अण्णाभाऊंचे कार्य जगाला उमजत होते म्हणुनच अण्णाभाऊंच्या साहित्याचे जगातल्या २८ भाषांमध्ये अनुवाद होत होता. जगातले साम्यवादी राष्ट्रांमध्ये अण्णाभाऊंचे साहित्य लोकप्रिय होत होते. मात्र भारतामध्ये १९४९ मध्ये मोरारजी देसाईंनी मुख्यमंत्री असताना अण्णाभाऊंच्या साहित्यावर बंदी आणली होती. अण्णाभाऊंनी लोकजागृती करू नये म्हणुन खोट्या दरोड्याच्या केसेस अण्णाभाऊवर भरलेल्या होत्या. त्यांच्या नावाने पकड वाॅरंट काढले होते.
अण्णाभाऊ फक्त साहित्यीक किंवा लोकशाहीर नाहीत. अण्णाभाऊंना साहित्यीक किंवा लोकशाहीर म्हणने म्हणजे अण्णाभाऊंच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला मर्यादित केल्याप्रमाने होईल. अण्णाभाऊंचे व्यक्तिमत्व त्यापेक्षा मोठे होते. अण्णाभाऊ दिनदुबळ्या समाजाचे क्रांतीनायक होते. अण्णाभाऊ क्रांतीयोध्दे होते. अण्णाभाऊ गुलाम समाजाचे लढावू योध्दा होते. फसलेल्या क्रांती आंदोलनाचे सरदार होते. अण्णाभाऊंना लोकशाहीर म्हणने म्हणजे अण्णाभाऊ लोकांचे मनोरंजन करत होते असा त्यांचा अर्थ होईल . पण अण्णाभाऊंचा जलसा हा लोकांना क्रांतीसाठी चेतवणारा होता. मनोरंजनासाठी नाही. अण्णाभाऊंना लोकशाहीर म्हणने म्हणने म्हणजे अण्णाभाऊंच्या क्रांतीच्या नायकाची उपेक्षा करने होय. अण्णाभाऊच्या साहित्यातील नायक अत्यंत खडतर परिस्थितीत लढत राहतात. जीवघेण्या परिस्थितीतही उमेद सोडत नाहीत. गरीब असले तरी लाचारी पत्कारत नाहीत. अण्णाभाऊ दलितांना, उपेक्षितांना साहित्यातून जगण्याची दिशा देतात. ती दिशा क्रांतीकडे बोट दाखवते. अण्णाभाऊंनी कधी जातीय , धार्मिक संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांचे सभासदही अण्णाभाऊ झाले नाहीत. शिवाजी महाराज, महाराष्ट्र, बाबासाहेब, रशियन क्रांती यांच्यावर पोवाडे गीत लिहीणारे अण्णाभाऊ मातंग समाजावर गीत लिहीत नाहीत. कारण अण्णाभाऊंच्या अंगी साम्यवाद मार्क्सवाद कुटून भरलेला होता. जात हा धर्माचा भाग आहे. आणि धर्म ही अफुची गोळी आहे. यावर त्यांचा ठाम विश्वास होता. गरिबी, लाचारी, शोषण हे सर्व विसरण्यासाठी धर्माचा वापर केला जातो. हे मत अण्णाभाऊना मान्य असल्यामुळे जाती धर्मापासून अण्णाभाऊ अलिप्तच होते.
मातंग समाजातील फकिरा त्यांनी नायक म्हणुन प्रकाशात आणला पण जातीय उदोउदो फकिरात नाही तर त्याच्या संघर्षाचा उदोउदो कादंबरीत केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भारतीय राजकारणात तळपत होते. समतेसाठी संघर्ष करत होते. त्याचा परिणाम अण्णाभाऊंच्या साहित्यावर होणारच होता. त्यामुळे तो साहिजकच काही कथांवर जाणवतोच. अण्णाभाऊ मार्क्सवादी पक्षाचे सभासद होते, प्रचारक होते. तर बाबासाहेब एका मोठ्या पक्षाचे नेते होते. अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर समाजाने स्विकारले असले तरी जिवंत असतांनी त्यांच्या कार्यामागे समाज एकजुटीने उभा असल्याचे दिसत नाही. फक्त मातंग समाजालाही अण्णाभाऊंनी कधी साद दिली ही नाही. त्यांनी संपुर्ण शोषीत समाजालाच आपल्या वर्तुळात घेण्याचा प्रयत्न केला.तोही समाज म्हणुन नव्हे तर एक वर्ग म्हणुन. बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ यांचे धेय्य एक होते. समाजात सर्व क्षेत्रात समानता स्थापित करणे. परंतु त्यांची कार्यपध्दती भिन्न होती. जात धर्म ही वास्तविकता आहे हे बाबासाहेबांना मान्य होते व लोक जाती पलिकडे विचार करू शकत नाहीत. हे बाबासाहेबांना माहीत होते त्यामुळे मार्क्सवाद स्विकारणारे सुध्दा भारतात जातीयवाद करतातच हे बाबासाहेबांनी वारंवार सांगितले. पण अण्णाभाऊ त्याबाबत मोठे आशावादी होते. एक दिवस मार्क्सवाद समजल्यानंतर जात धर्म नष्ट होतील यावर त्यांचा विश्वास होता. मात्र बाबासाहेबांच्या बद्दल अण्णाभाऊंना अमाप आदर होता. म्हणुनच फकिरा ही कादंबरी बाबासाहेबांच्या लेखणीला अर्पण केली. बाबासाहेब बुध्दाच्या मार्गाने परिवर्तन आणु इच्छित होते. तर अण्णाभाऊ मार्क्सवादाने . त्यामुळे मातंग समाजाने अण्णाभाऊंना अपेक्षित मार्क्सवाद स्विकारला तर शोषन करणाऱ्यांना जास्त नुकसान दायक होईल. कारण मार्क्स हा रक्तरंजित क्रांतीवर विश्र्वास ठेवतो. परंतू दुर्दैवाची गोष्ट मातंग समाज अण्णाभाऊंच्या विचारांचा मागोवाच घेत नाही. अण्णाभाऊ लेखक आहेत पण अण्णाभाऊंचे अनुयायी वाचक नाहीत. त्यामुळे त्यांच्या विचारांचे अनुसरून करणारे तर दुरच.
मला वाटते अण्णाभाऊंनी मातंग समाजाला खरा आणि एकमेव संदेश आपल्या गितातून दिलेला आहे. त्या संदेशालाच मातंग समाजाने मातंग समाजाचे , चळवळीचे संविधान बनवायला हवे. तो संदेश म्हणजे " जग बदल घालुनी घाव" हे गीत. मातंग म्हणजे हत्ती आणि ऐरावत म्हणजे हत्ती. या गितातील ऐरावत म्हणजे मातंग समाज आहे आणि मला म्हणजेच माझ्या मातंग समाजाला हे अण्णाभाऊंना अपेक्षित आहे. जग बदल घालुनी घाव म्हणजेच जग आहे तसे न स्विकारता त्याच्या समोर लोटांगण न घालता, त्याला शरन न जाता त्याच्यावर घाव घालून जगाशी संघर्ष करून ते बदलायला हवे. गेले सांगून मला भिमराव जग बदलायचे त्यावर घाव घालायचा कसा, हे कुणी सांगितले तर भिमरावाने सांगितले. मग कसा घाव घालायचा व जग कसे बदलायचे हे सुध्दा भिमरावानेच सांगितले. म्हणुन भिमरावाने जे सांगितले ते सर्व वाचले पाहिजेत व त्याप्रमाणे जगावर घाव घालून ते बदलायला हवे. गुलामगिरीच्या चिखलात या ओळी स्पष्ट सांगतात मातंग समाजाचे जिवन हे स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य म्हणजे मनाप्रमाणे जगने. मात्र समाजाची परिस्थिती अतिशय हालाखीची आहे. त्यामुळे मनाप्रमाणे जगता येत नाही तर जग ज्या प्रमाने जगवते त्या प्रमाने जगावे लागते ही गुलामगिरी आहे. हा गुलामगिरीचा चिखल आहे. घृणास्पद परिस्थिती आहे या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मातंग समाज म्हणजे ऐरावत आणि ऐरावतही म्हणजे फक्त साधासुधा हत्ती नाही.तर राजाचा हत्ती. एकावेळी राजसत्ता असलेला मातंग. समाज या गुलामगिरीच्या चिखलात का रुतून बसला आहे? अंग झाडुनी निघ बाहेरी ... अंगामध्ये प्रचंड बळ आहे. परंतू ज्याला तू पाणी समजतोय तो चिखल आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. अंगावरचा हा चिखल ही अगतिकता, नकारात्मक मानसिकता झटकून टाका बाहेर या आणि बिनीवरती घाव घाला. " बिनीवरती घाव " हा शब्द खुप सखोल आहे. बिनीवरती म्हणजे शत्रू शोषक ज्या प्रमाने बिन वाजवतात त्याप्रमाने आपन डोलतो. त्या प्रमाने आपन वागतो. आपले शत्रू आपले शोषक ज्या इशाऱ्यावर आपल्याकडून कृती करून घेऊ इच्छितात परंतू आपल्याला गुलामगिरीतच ठेवतात. त्याच्या ईशाऱ्यावर बोलने कृती करने सोडुन त्यावर धावा बोलला पाहिजेत. हि बीन राजसत्ता, संघटना, इतिहास , वैचारिक मार्गदर्शन, संस्कार स्वरूपात आजही आहे. त्या बिनीवरती धावा बोलायचा म्हणजे शत्रुच्या संघटना प्रमाने कृती करने सोडले पाहिजेत.ते सांगतात तो इतिहास नाकारला पाहिजेत. त्यांचे वैचारिक मार्गदर्शनाचे हस्तक होता कामा नये. त्यांचे संस्कार जे जातीय भेदभाव करणारे आहेत ते न स्विकारता त्याच्या विरोधात धाव घेतली पाहिजेत. आजच्या काळात शत्रुची बिन म्हणजे मेडियाच आहे. त्यांनी सुध्दा जातीय संस्कार सोडावेत यासाठी जग बदलायलाच हवे. घाव घालायलाच हवेत.
आमचे शत्रू कोण आहेत, आमचे शोषन कुणी केले हे अण्णाभाऊ पुढिल ओळीत सांगतात. धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले या त्या ओळी आहेत. भांडवलदार व धर्मांध विचारसरणी ह्या मातंग समाजाच्या शत्रू आहेत.ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे पुन्हा पैसे जातील.धनवंत संपत्तीवर डल्ला मारून बसल्यावर संपत्तीचे समान वाटप न होता विषम वाटप होईलच . मग त्यातून समाजाची पिळवणूक होत आलेली आहे. धनवंत ठरवतील त्याप्रमाणे, त्या मजुरीवर , ते काम करावे लागते. काल बाळंतपण करणारी मातंग स्त्री एक पायली ज्वारी घेत होती तर तीच डिलेवरी आज दवाखान्यात होते त्याचे आज हजारो रुपये घेतात. योग्य मोबदला न देता मातंग समाजाची पिळवणूक होत आलेली आहे तर धर्मांध सुध्दा तसेच छळले आहे. त्यांनी सुध्दा सामाजिक जिवनातून पुर्णतः उधवस्त केले आहे.आजही धर्मांध मातंग समाजाच्या विरोधात षडयंत्र करतात. मात्र समाजाच्या ते लक्ष्यात येत नाही.चोर झाले साव या ओळीत अण्णाभाऊ म्हणतात धर्मांध व भांडवलदार वास्तविक पाहता हे चोर आहेत तेच सभ्य पणाचा आव आणत आहेत. मुळ देशाचे मालक आपन आहोत. आपन इथले मुळ निवासी आहेत. इथले राजे आहोत. ईथल्या संपत्तीचे मालक आहोत. पण बाहेरून आलेले हे आर्य चोर आहेत तेच न्याय करणारे झालेत. अण्णाभाऊंचा इतिहासाचा अभ्यास व्यापक दिसून येतो. कदाचित बाबासाहेबांनी सांगितलेल्या इतिहासाने अण्णाभाऊंना प्रभावित केले आहे. नाहीतर चोर झाले साव असे अण्णाभाऊंनी म्हणण्याचे तात्पर्य काय असावे? ठरवून आम्हा हिन कलंकीत , जन्मोजन्मी करून अंकीत या ओळी वरून स्पष्ट कळते आहे कि हे गीत मातंग समाजासाठीच आहे.कदाचित संपुर्ण दलितांसाठी आहे. मातंग समाजासाठी संदेश आहे. इथल्या धर्माने व्यवस्थेने आम्हाला हिन ठरवले कलंकीत केले अपमानीत केले.मनुस्मृती व सर्व धर्म ग्रंथात मातंग समाजाला अपमानीत केले आहे. त्यांचे सर्व अधिकार नाकारले आहेत. अण्णाभाऊंना यांचे शल्य बोचत आहे हे जाणवते आहे.
जन्मोजन्मी आमच्यावरच गुलामगिरीचे जिवन लादले. आमच्यासोबत भेदभाव केला. मात्र ज्या सर्वांसोबत हा भेदभाव केला. त्यांनी एकजुटीच्या रथावर आरूढ होऊन पुढे चालावे. रथ युध्दासाठी वापरायचे तर संघर्ष करतांनी ज्या सर्वांवर अन्याय झाला त्यांनी लढण्यासाठी एकजुट व्हावे. सर्व दलितांनी एकजुट व्हावे ही अण्णाभाऊंची अपेक्षा आहे. अण्णाभाऊंच्या खऱ्या वारसदारांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तरच अण्णाभाऊंचे नाव घेण्याचा त्यांना हक्क आहे. अण्णाभाऊंचा जिवन संघर्ष व त्यांचे साहित्य हा समाजासाठी संदेश आहे. त्याचप्रमाणे राज्घयटनेची प्रस्तावना राज्यघटनेचा आत्मा आहे. त्या प्रमाणे जग बदल घालून घाव हे गीत अण्णाभाऊंच्या साहित्याचा आत्मा आहे. अण्णाभाऊ साठे ची जयंती फक्त धार्मिक सोहळ्यांसारखी साजरी न होता. फक्त भाषणबाजी न होता . अण्णाभाऊंना अपेक्षित समाज तयार व्हावा. यासाठी कृतीशील प्रयत्न व्हायला हवेत. जागतिक दर्जांच्या त्यांच्या विचारांना समजून घेतांना मार्क्स , डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य सुध्दा वाचायला हवे. म्हणजे अण्णाभाऊंना साहित्याच्या माध्यमातून काय म्हणायचे आहे तेव्हाच अर्थबोध होईल. अन्यथा फक्त करमणुकी पुरतेच साहित्य मर्यादित होईल.
जग बदल घालुनी घाव । सांगुन गेले मला भिमराव ।
गुलामगिराच्या या चिखलात । रुतुन बसला का ऐरावत ।
अंग झाडुनी निघ बाहेरी । घे बिनीवरती धाव ॥
धनवंतानी अखंड पिळले। धर्मांधानी तसेच छळले।
मगराने जणू माणिक गिळले। चोर जाहले साव ॥
ठरविन आम्हा हिन कलंकित । जन्मोजन्मी करुनी अंकीत ।
जिणे लादले वर अवमानित । निर्मुन हा भेदभाव ॥
एकजुटीच्या या रथावरती । आरूढ होउनी चल बा पुढती ।
नव महाराष्ट्रा निर्माणू जगती । करा प्रकट निज भाव ॥ अण्णाभाऊंच्या जन्म शताब्दी वर्षाच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. रूपराव देवराव नाटेकर
9823453275
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
उत्तर द्याहटवाYou are saying very right but Dr Ambedkar said " it will take edeges to distory the cast system in this country.cant we follow Dr Ambedkar way of article.
उत्तर द्याहटवाTotally agree with you.
उत्तर द्याहटवा