मातंग समाजाचा भव्यदिव्य इतिहास जगातील कोणीच नाकारू शकत नाही त्याचा पुरावा स्पष्टपणे बायबलमध्ये सापडला आहे. 'मातंग' हां शब्द अलीकडे मांग संदर्भात मोठ्या प्रमाणात वापरला जातो मात्र फुलेंच्या काळापर्यंत किंवा अण्णाभाऊंच्या काळापर्यंत मातंग शब्दापेक्षा 'मांग' म्हणुनच सर्वत्र उल्लेख आहे. अण्णाभाऊंच्या साहीत्यात ' मांग' हां शब्दच मोठ्या प्रमाणात आहे. मातंग हा शब्द अण्णाभाऊंच्या प्रचंड मोठ्या साहीत्यात सापडने दुर्मिळच . नंतरच्या अगदी अलिकडे मोठ्या प्रमाणात 'मातंग' या शब्दाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. मात्र मांग किंवा मातंग हे शब्द समानार्थीच आहेत. महाभारतात मतंग हां शब्द अस्पुश्याशी संबंधीतच येतो. जातक कथांमध्ये मातंग हा शब्द बुध्दाचा पुर्वजन्मातील एक जन्म ज्या जन्मातील नाव मातंग आहे तो सुध्दा शुद्र किंवा हलक्या जातीचा म्हणुनच येतो. चांडाळ, मातंग, मांग, मेघ,मेग, माग, मंग, मग्ग अश्या अनेक उच्चार असलेला संबोध मातंग समाजाशीच संबंधीत आहे. दहा हजार वर्षाच्या इतिहासात अनेक सुक्ष्मसे बदल आपल्याला विवीध काळामध्ये बघायला मिळतात.
आनंदाची गोष्ट म्हणजे बायबलमध्ये मातंग समाजाशी संबंधीत जो उच्चार सापडतो तो मागी कींवा मागस् , मेग म्हणुन आढळतो. Gosspels of Magi म्हणुन शतकोंशतके पाश्चात्य जगामध्ये चर्चा होते असते. ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा पुर्वेकडील देशामधुन तीन मागी आले. हे मागी कोण? कुठल्या देशाचे? त्यांचे नाव? त्यांची संख्या ? यांचे अप्रुप सर्व पाश्चिमात्य जगाला वाटते. त्यावर सतत चर्चा होते असते. तुम्ही जर गुगल वर मागी , Three King of East, Three wise man असे सर्च केले तर त्या विषयी माहीतीचा खजिनाच बाहेर पडेल. अनेक पुस्तकें, चित्र, व्हीडीओज तुम्हाला सापडतील. अनेक लेखकांनी अनेक पुस्तकें लिहून आपले मत मांडले आहे. Magi हा अनेकवचन असलेला शब्द आहे. तर त्याचे एक वचन Magus मागस् किंवा मेगस कसा उच्चार होतो. दोन्ही उच्चार मातंग समाजाकडेच बोट दाखवतात. पुर्वेकडील देशामधून मांगी आलेत .ईस्त्राईलच्या पुर्वेकडे राहणारा "मागी किंवा माग हा एकमेव मातंग समाज आहे. कालही होता आजही आहे. ते पुर्वेकडून म्हणजे पार्शिया , अफगणिस्तान , भारत या देशामधून आले असावेत असे मत प्रवाह आहेत सर्व मते मान्य केले तरीही प्राचीन काळी भारताची सिमा या सर्व भुप्रदेशांना सामावून घेणारी होती. यांना जर इतर देशाचे मानले तरी हे सिध्द होते की मातंग समाज भारतातच नव्हे तर इतर देशामध्ये सुध्दा होता हेच सिध्द होते.
मांगी ख्रिस्ताचे भविष्य सांगण्यासाठी बेथलेहेम येथे जातात. मांगी म्हणजे कोण? मागी म्हणजे पुर्वैकडील देशाचे राजे म्हणुन त्यांचा उल्लेख होतो. मांगी म्हणजे फक्त व्यक्तीच जर असत्या तर मोठे अप्रुप नसते. पण मागी म्हणजे पुर्वेकडील देशाचे राजे म्हणुन त्यांचा उल्लेख आहे. Their identification as kings in later Christian writings is probably linked to Isaiah 60:1–6, which refers to "kings [coming] to the brightness of your dawn" bearing "gold and frankincense".[5]
या मांगी ना " ख्रिस्ती जगामध्ये "तीन विद्वान" Three wise men आणि Three King of East म्हणुन ओळखले जाते. ख्रिस्त काळामध्ये पुर्वेकडे मातंग समाज शासक होता त्याचा पुरावा आहे. मांगी या शब्दाचा अर्थ King of East होतो. मुळ बायबल मध्ये Magi ऐवजी Magos हां शब्द आहे .
मग वर उल्लेखीत मागी हे मातंगच होते याला पुरक ठरतील असे अनेक पुरावे संदर्भ सापडतात. येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबरला झाला आणि मागी हे 6 जानेवारीला त्यांना भेटले. म्हणजे ज्या रात्री मुलाचे बारसे करण्याची प्रथा भारतात आहे. त्याच रात्री येशू ख्रिस्तांना मागी भेटून भेटवस्तू देतात. बारश्याला नाव ठेवने, पाळना म्हणने, या प्रकारचा समारोह भारतात करतात.निदान महाराष्ट्रात मातंग समाजासह सर्व बहुजन समाज करतो. त्याच बारादीला येशू ख्रिस्ताला मागी भेटतात. एका अर्थाने बारादी साजरी करतात. ख्रिस्ती जगामध्ये त्या प्रित्यर्थ आजही खुप ठिकाणी वेगवेगळ्या पध्दतीने तो दिवस साजरा केल्या जातो. त्या सणाला Ephiphany (Holiday) म्हणतात. काही ठिकाणी "ख्रिस्ताचा बाप्तीस्मा"(Baptisma of zesus) म्हटले जाते. काही वेळा Three kings day म्हटले जाते. काही ठिकाणी "तीन राजांचा केक " कापला जातो. मागीचे महत्त्व आपल्याला कळून येईलच आणि त्याचा भारतीय संस्कृतीशी असलेला संबंधही कळून येईल.
तिन मागी हे भविष्यशास्त्रात पारंगत होते. मातंग समाज सुध्दा भविष्यशास्त्रात पारंगत होता. भाडळी ही मातंग स्त्री भविष्यवेत्ता म्हणुन आजही ओळखली जाते. "सहदेव भाडळी " हा ग्रंथ आजही भारतातील ज्योतीष्य शास्त्रातील प्रसिध्द ग्रंथ आहे. त्यातील भाडळी ही स्त्री मातंग होती हे सर्वमान्य आहे. मात्र संपुर्ण ग्रंथच हां मातंग समाजाशी संबंधीत आहे. मात्र सहदेव ब्राम्हण असल्याची कपोलकल्पीत कथा त्यामध्ये घुसडविण्यात आली. आणि भविष्यवेत्ता भाडळीला श्रेय मिळू नये म्हणून सुध्दा त्यामध्ये भाकडकथा घुसवून मातंग समाजातील ज्ञानाचे अवमुल्यन करण्यात आले. मातंग समाजातील मागधी भाषेतील ग्रंथ संपदा नष्ट करून मुळग्रंथाचे ब्राम्हणीकरन करून त्यामधील मातंग संस्कृती , इतिहास पुर्णत: नष्ट केला. व संस्कृतमध्ये पुनर्लेखन करून ब्राम्हणीश्रेष्ठत्व त्यामध्ये घुसडवीले. मात्र मुळत: या देशातील सर्वमान्य व श्रेष्ठ संस्कृती मातंग होती. मागीच्या उल्लेखावरून स्वरूपावरून दिसून येते.
मुळ बायबल मधील उल्लेख Magos आहे. लेटीन किंवा ग्रीक भाषेत Budha चा उल्लेख Buddos असा केला आहे. त्यावरुन Mag चा उल्लेख Magos केला गेला आहे यात काही शंका नाही. Magos हा शब्द समाज यांचा इतिहास अतिशय प्रचंड आहे. Magi मागी हे पारशी लोकांच्या धर्मगुरूला सुध्दा म्हटले जाते. प्राचीन पारसी लोकांना सुध्दा मांगी म्हटले जाते. त्याची संस्कृती व संबंध सुध्दा मातंग समाजापर्यंत पोहचतो. माझे वैयक्तीक मत असे आहे की मुस्लीम, ख्रिश्चन, पारसी, हिंदू या आधुनिक धर्माच्या अगोदर जो धर्म जगात होता तो मातंग धर्म होता. मातंग समाज होता. या विषयी पुढील लेखात मी त्याविषयी लिहीणार आहेच.
मागी पुर्वेकडील राजे हे मातंग होते या विषयी आणखी एक पुरावा बघू . मागीचे अनेक चित्र रेखाटले आहेत . त्याविषयी अनेक पुस्तकें लिहील्या गेली आहेत. मांगी हे मातंग होते हे सिध्द करणारा पुराना म्हणजे उपरोक्त तिन्ही मागीच्या हातामध्ये डफ वाजवतांनाचे चित्र आहे.
Adoration of the Magi from the East, Church Agaçalti, IX-XI centuries, Ihlara Valley, Aksaray, Cappadocia, Central Anatolia,
- Image ID: एडोरेशन ऑफ मागी नावाचे नवव्या ते अकराव्यया शतका दरम्ययानचे जे चित्र आहे. त्यामध्ये तिन्ही मांगी डफ वाजवताना दिसत आहेत. मागी हे मांग आहेत या पेक्षषा मोठापुरावा तो काय. मांगी हे मातंग होते, ते विद्वान होते. मांगी हे पुर्वेकडील राजे होते. मांगी हे मातंगच होते हे सिध्द करणारा आणखी एक पुरावा The Catholic Encyclopedia vol 9 New york: Robbert Appleton company 1910 2 may 2015 मध्ये Magi या शब्दाचा अर्थ Drum Walter सांगितला आहे. म्हणजे ड्रम वाजविणारा सांगीतला आहे. मागी हे पुर्वेकडील राजांसाठी वापरला जाणारा शब्द. मांगी हे पुर्वेकडील राजे होते. मांग हेच मागी होते. व मांगी हेच पुर्वेकडील राजे होते. मागी जेव्हा बेथलेहेम ला गेले तेव्हा भारतात कोणाचे राज्य होते. यांचा शोध आपण घेतला तर तेव्हा भारतामध्ये महाजन पद होते असा उल्लेख इतिहासात आहे. महाजन पदे याच्या सखोल मध्ये गेल्यास महाजन पदे हे महाजन पदे नसून मांगजन पद आहेत हेच सिध्द होईल. कारण सम्राट प्रसेनजीत महाजन पदातील एक राजा होता. आणि तो मातंग होता. इतर महाजन पदावरील राजे त्याचे नातेवाईक होते. बंगाल , विदर्भ प्रांतावर त्याचे राज्य होते. अनेक राजे शुद्र होते. हे सर्व मातंग वंशाशी संबंधीत आढळतात. त्यामुळे महाजन पदे नसून मांगजन पदे असावीत अशी शंका आहे. मांग हे पुर्वेकडील शासक होते यात शंका नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पुश्यता ही इ.स. सहाव्या शतकामध्ये सुरू झाल्याचे उल्लेख केला आहे. अस्पृश्य पुर्वी कोण होते? या पुस्तकामध्ये त्यांनी मातंग स्त्री, मातंग राजपुत्री चा संदर्भ देऊन अस्पृश्यता ही सहाव्या शतकापर्यंत नव्हती. तर अस्पृश्य हे काही ठिकाणी राजे होते हे सांगितले आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यासाठी जे उदाहरण दिले ते मातंग राजपुत्रीचे उदाहरण दिले आहे.महात्मा फुलेंनी स्पष्टच म्हटले आहे मांग हे शासनकर्ते आहेत. महात्मा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेला इतिहास वाचल्याशिवाय मातंग समाजाला राजांचे गुलाम कसे झालो हे कळणार नाही.
छान माहिती
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवातथ्यांशाकडे जाणारे संशोधन आहे.आणखी सखोल अभ्यास करून संशोधन करण्याची आवश्यकता आहे.
उत्तर द्याहटवाडाॅ.धोंडोपंत मानवतकर,
धन्यवाद साहेब
हटवाNice line
उत्तर द्याहटवाIt's very clear about your view but this subject need more research.
उत्तर द्याहटवाIt's very clear about your view but this subject need more research.
उत्तर द्याहटवाAbsolutely Right
हटवाआपण सांगितलेला इतिहास वस्तू तिथीवर आधारित आहे त्यामुळे आपले वाचन खूपच सखोल आहे आपणास धन्यवाद देतो
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
उत्तर द्याहटवाश्रीकृष्ण चे गुरू सांदीपनी ऋषी, मातंग होते, यावरून मातंग हे श्रेष्ठ होते, रामायण, महाभारत काल मातंगाचे श्रेष्ठत्व दिसून येते
उत्तर द्याहटवा